प्रिया बापट आणि उमेश कामतचा गोड फोटो होतोय चाहत्यांच्या चर्चेचा विषय, पाहा ‘तो’ फोटो


सिनेतारकांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचे असते. त्यांची ओळख कुठे झाली ? कसे भेटले ? किती वर्षे प्रेमप्रकरण होते? अशा अनेक गोष्टी जाणून घ्यायला प्रेक्षकांना फार आवडतात आणि त्यातच जर आपले आवडते प्रसिद्ध जोडपे असतील तर त्याची गोष्टच वेगळी असते. मराठी चित्रपटसृष्टीतीत देखील असे अनेक जोडपे आहेत ज्यांच्याविषयी बोलताना किवा ऐकताना प्रेक्षकांना कधीच कंटाळा येत नाही आणि त्यातलेच एक गोड जोडपे म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामात होय.

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि उमेश कामत हे अत्यंत ‘क्युट कपल’ म्हणून ओळखले जातात. लग्नाच्या ९ वर्षानंतर आणि १५ वर्ष एकत्र राहिल्यानंतर सुद्धा या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात कोणत्याच प्रकारचा तणाव नाही. एकमेकांवर दोघे किती प्रेम करतात हे त्यांच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टवरून नेहमीच दिसून येते. प्रिया बापट सोशल मिडीयावर फार सक्रीय असते आणि याच माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सातत्याने राहायचा प्रयत्न करत असते. या सोबतच अभिनेता उमेश कामत देखील मागे नाही. तो देखील तितकाच सोशल मिडीयावर सक्रीय असल्याचे दिसून आले.

नुकताच उमेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबत फोटो अपलोड केला आहे. ज्यात ते दोघे खूप सुंदर दिसत आहे. त्यासोबत उमेशने प्रियासाठी एक गोड मेसेज देखील लिहिला आहे. या फोटोमध्ये ते आपल्या आयुष्याचे सुंदर क्षण एकमेकांसोबत व्यतीत करत आहेत. त्यांचा हा फोटो इतका सुंदर आहे कि चाहते न चुकता त्यांच्या या फोटोला भरभरून प्रेम आणि प्रतिक्रीयांचा वर्षाव करत आहेत.

प्रिया आणि उमेश यांची पहिली भेट झाली ती चंद्रकांत कुलकर्णी यांच्या भेट या चित्रपटाच्या प्रीमियरला. या आगोदर ते दोघे कधीच सेटवर एकमेकांना भेटले नव्हते. त्यांनतर आभाळमाया या गाजलेल्या मालिकेत दोघांनी सोबत काम केलंय. प्रिया त्याच्या कामाने इतकी प्रभावित झाली कि दोघांनी एकमेकांचे नंबर शेयर केले होते आणि तिकडूनच त्यांच्या दोघांमध्ये प्रेमाची पालवी फुटायला सुरवात झाली होती.

त्यानंतर वादळवाट ह्या मालिकेत त्या दोघांना पुन्हा एकदा काम करायची संधी मिळाली होती आणि या मालिकेपासूनच दोघांमधली जवळीक अधिक वाढत गेली. कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल पण प्रिया हिनेच उमेशला लग्नासाठी विचारलं होते. उमेश हा प्रियापेक्षा आठ वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे त्याने लग्नाचा विचार करायला फार वेळ घेतला होता. आपल्या पहिल्या भेटीच्या ३ वर्षानंतर सन २००६ साली दोघांनी एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली. ५ वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर सन २०११ साली दोघांनी लग्न केले.

आपल्या सोज्वळ आणि दमदार अभिनयाच्या जोरावर प्रियाने रसिकांची मने जिंकली. आता ‘आणि काय हवं’ यावेब सिरीजच्या माध्यमातून हे दोघे पुन्हा प्रेक्षकांसमोर आले होते. याअगोदर त्यांनी ‘टाइम प्लीज’ या चित्रपटात देखील एकत्र काम केले आहे. ‘आणि काय हवं’ ही सहा भागांची वेबसिरीज होती.

सन २००० साली प्रदर्शित झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातून प्रिया बापट हिने आपल्या करियरची सुरवात केली होती. महेश मांजरेकर यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा तिचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट. याशिवाय ती अनके अनेक चित्रपटात दिसली होती. तर ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सिरीजच्या तिच्या दमदार भूमिकेतून तिने आपली एक वेगळीच छाप पाडली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.