Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड कुणाल खेमूसोबत घडला धक्कादायक प्रसंग, भर रस्त्यात व्यक्तीने शिव्या देत केलं ‘असं’ काही

कुणाल खेमूसोबत घडला धक्कादायक प्रसंग, भर रस्त्यात व्यक्तीने शिव्या देत केलं ‘असं’ काही

अभिनेता कुणाल खेमू (Kunal Kemmu) सोबत एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून त्याने या घटनेची माहिती दिली आहे. तो रविवारी (६ मार्च) सकाळी ९च्या दरम्यान नाष्टा करण्यासाठी पत्नी सोहा अली खान (Soha Ali Khan), मुलगी, शेजारी आणि त्यांच्या दोन मुलांसोबत निघाला होता. एका कार चालकाने त्याच्या गाडीला अडचणीत आणले आणि त्याच्या पत्नीसह कारमध्ये बसलेल्या सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्याने त्या कारचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्याने त्याच्या कारमधून काढला होता. यात एक पाढंरी लॅम्बोर्गिनी त्याच्या कारच्या समोर दिसत आहे.

कारच्या फोटोसोबत त्याने मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे. त्यासोबत त्याने लिहिले की, “आज सकाळी ९ वाजता मी माझ्या मुलगी, पत्नी आणि शेजाऱ्यांसोबतसोबत नाष्टा करण्यासाठी जुहूच्या दिशेने जात होतो. तेव्हा एका कार चालक विचित्र पद्धतीने गाडी चालवत होता. तो सतत हॉर्न वाजवत होता, सोबतच मला तो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने अचानक मध्येच गाडी थांबवली होती.”

तो पुढे म्हणतो की, “असं करून त्याने स्वत:चा जीव तर धोक्यात आणलाच होता. पण माझ्या कारमध्ये बसलेल्या लोकांचीही सुरक्षा धोक्यात आली होती. मी या प्रसंगातून वाचण्यासाठी जोरात गाडीचा ब्रेक मारला. त्यानंतर तो व्यक्ती कारच्या बाहेर आला आणि खूप वेळा त्याने मिडल फिंगर दाखवली आणि मला शिव्याही दिल्या. आमच्या मुलांसाठी ही घटना फार धक्कादायक होती. त्यावेळी माझ्या गाडीत महिला आणि लहान मुले होते. ही घटना रेकॉर्ड करण्यासाठी मी खिश्यातून फोन काढण्याच्या आधीच त्याने त्याची गाडी पळवली. मी मुबंई पोलिसांना आग्रह करतो की, या व्यक्ती वर कडक कारवाही करा.”

कुणालची पत्नी सोहा अली खान ही सैफ अली खानची बहीण आणि अभिनेत्री शर्मिला टागोरची मुलगी आहे. कुणाल आणि सोहा या दोघांनी मागच्या महिन्यातच त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला होता. सोहा अली खानने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले होते, “सात वर्ष पुर्ण झाले माझ्या प्रेमा.” कुणालनेही तिच्या इंस्टाग्रामवर काही गोड फोटो शेअर केले आणि तिला शुभेच्छाही दिल्या होत्या. त्या दोघांनी २५ जानेवारी २०१५ ला लग्न केले होते. त्या दोघांची बॉलिवूडमध्ये पावरफुल कपलमध्ये गणना केली जाते.

हेही वाचा 

हे देखील वाचा