अभिनेत्री जुई गडकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी ती करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे ती चर्चेत असते. गेल्या 18 वर्षांपासून जुई पनवेल येथील नेरेगावातील शांतीवन आश्रमात दिवाळी साजरी करत आहे. या वर्षीही तिने हा उपक्रम सुरू ठेवला आहे जुईने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आश्रमातील कृष्ठरोगाने ग्रस्त रुग्ण आणि निराधार आजी-आजोबांशी दिवाळी साजरी करत असे सांगते.
जुई (Jui Gadkari) आश्रम सजवून, रांगोळी काढून आणि दिवाळीच्या सणाचे कार्यक्रम आयोजित करून आश्रमातील लोकांना आनंद देते. जुई म्हणाली, “दिवाळी हा एक आनंदाचा सण आहे. पण, काही लोकांना या सणाचा आनंद घेता येत नाही. अशा लोकांना आनंद देण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या 18 वर्षांपासूनसुरू ठेवला आहे आणि यावर्षीही मी हा उपक्रम सुरू ठेवला आहे.” जुईच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या या कार्याबद्दल तिचे आभार मानले आहेत.
तिने पोस्ट करताना लिहिले की, “कृपया व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला दान करायचे असेल तर मला संपर्क करा. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे पैसे कधीही चुकीच्या हातात जाणार नाहीत.. गरजूंना मदत करणे हे एक दैवी सामाजिक कारण असेल.”
View this post on Instagram
जुईच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. कमेंट करताना एकाने लिहिले की, “जुई ताई…मी अजून तरी कोणी मराठी स्टार असं काही सामाजिक कार्य करतं आहे, असं ऐकलं नाही. तू खरंच खूप छान आहे.” तर दुसऱ्याने लिहिले की, “सायली आम्हाला तुझा अभिमान आहे. माणसापेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे, ते तू दाखवून दिलं.” आणखी एकाने लिहिले की, “खरच अभिमान वाततो की, जगत अजुनही माणुसकी शिल्लक आहे. आपुलकी शिल्लक आहे. छान काम.” (A social media post made by Jui Gadkari of Tharla Ter Mag fame has gone viral)
आधिक वाचा-
–‘हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
–‘माझ्या बायकोला, मुलांना…’ अखेर राज कुंद्राने उतरवला मास्क; चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित