Monday, October 2, 2023

जुई गडकरीकडून इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्त ग्रामस्थांना मदतीचा हात; लोकांना केले ‘हे’ आव्हान

रायगड जिल्ह्यात बुधवारी (19 जूलै) मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत अनेकांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे अनेक जण यावर हळहळ व्यक्त करत आहेत. यावर प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरीने एक पोस्ट शेअर केली होती. तिने तेथील काही फोटो देखील शेअर केले होतो. आता जुईने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

जुई सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडिया अकांउटवरून काही ना काही पोस्ट शेअर करत असते. ती सामाजिक प्रश्नांवर देखील आपले मत मांडताना दिसते. सध्या जुईने इर्शाळवाडीत झालेल्या घटनेवर एक पोस्ट शेअर केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जुई इर्शाळवाडीला गेली होती. तेव्हा तिने तेथील माणसांच्या घरात जेवणाचा अस्वाद घेतला. नुकतेच जुईने एका पोस्टच्या माध्यमातून पुढाकार घेत येथील ग्रामस्थांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. जुईने एक नवीन टीम जीवनावश्यक वस्तू इर्शाळवाडीतील नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे.

Jui Gadkari

जुईने एक इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले की, “इर्शाळवाडीसाठी मदत पाठवायची असल्यास सर्व व्यक्तींनी मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण या वस्तू त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवेले जाणार आहे. तसेच इत्यादी जीवनावश्यक वस्तू इर्शाळवाडीपर्यंत माझ्या टीमकडून पोहोचवल्या जातील..” असे तिने सांगितले. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, 19 जुलैच्या रात्री 11च्या सुमारास ही दरड कोसळला आहे. त्यामुळे 22 जण बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेकांची घरे त्या दरडखाली बुजली गेली. चौक गावापासून 6 किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात असलेल्या आदिवासीवाडीतील घरांवर दरड कोसळला होता. तेथील लोकांना मदत दिली जात आहे. तेथे बचाव कार्य सुरू आहे. (Jui Gadkari extends helping hand to Irshalwadi disaster victims)

अधिक वाचा- 
अभिनेत्रीने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधला सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग; म्हणाली, “दिग्दर्शक, निर्माता अन् प्रमुख अभिनेत्याबरोबर…”
अभिनेत्री कृती शेट्टी घेतेय पावसाची मजा, पाहा नयनरम्य फोटो

हे देखील वाचा