Sunday, December 8, 2024
Home अन्य ‘माझ्या बायकोला, मुलांना…’ अखेर राज कुंद्राने उतरवला मास्क; चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित

‘माझ्या बायकोला, मुलांना…’ अखेर राज कुंद्राने उतरवला मास्क; चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित

पोर्नोग्राफी प्रकरणात दोन वर्षांच्या कारवासातून सुटलेल्या राज कुंद्राच्या जीवनावर आधारित ‘यूटी 69’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात राज कुंद्राची भूमिका त्याने स्वतः साकारली आहे. शाहनवाज अली दिग्दर्शित या चित्रपटात राज कुंद्राची जेलमधील कहाणी दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये, पोलिसांकडून आणि इतर कैद्यांकडून राज कुंद्राला कशाप्रकारे वागणूक मिळाली हे दाखवण्यात आलं आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्राच्या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहिलं आहे की, “ऑल द बेस्ट , कुकी. तू एक धाडसी व्यक्ती आहेस. मला तुझ्याबद्दल सर्वात जास्त कौतुक वाटते. ही आहे तुझी हिंमत आणि सकारात्मकता.” राज कुंद्राने पुढे सांगितले की, चित्रपटातून त्याला त्याच्या जेलमधील अनुभवांचे चित्रण करायचे आहे. चित्रपटात त्याला जे वाटले, ते चित्रपटातून दाखवायचे आहे. ‘यूटी 69’ हा चित्रपट 3 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

राज कुंद्रा म्हणाला की, “जेव्हा मी या चित्रपटाबाबत पहिल्यांदा शिल्पाबरोबर बोललो तेव्हा ती जास्त आनंदी झाली नाही. मी शिल्पाला सांगितलं की, स्क्रिप्ट पूर्ण रेडी आहे. आता फक्त तुझ्या उत्तराच्या मी वाट पाहत आहे. सुरुवातीला शिल्पाला माझी कल्पना अजिबात आवडली नव्हती. हा चित्रपट होणार नाही, असंच तिला वाटत होतं. मग मी स्क्रिप्टवर दिग्दर्शक शाहनवाजबरोबर चर्चा केली होती. त्यानंतर शिल्पाला चित्रपटाविषयी संपूर्ण माहिती दिली. त्यावेळेस शिल्पाला समजलं की, चित्रपट फक्त व्यवस्थेच्या विरोधात आहे.”

पोर्नोग्राफी प्रकरणात दोन वर्षांच्या कारवासातून सुटलेल्या राज कुंद्राने आजच्या ट्रेलरच्या निमित्ताने आपला चेहरा उघडला. या चित्रपटात राज कुंद्राची भूमिका त्याने स्वतः साकारली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात 2021 साली राज कुंद्राला अटक केली होती. याप्रकरणी तो 2 महिने जेलमध्ये होता. सप्टेंबर 2021मध्ये त्याची जेलमधून सुटका झाली. तेव्हापासून राज मास्क घालून फिरत होता. त्याला मास्क मॅन असं नावही पडलं होतं. (The trailer of the film UT 69 based on the life of Raj Kundra who was released from two years of imprisonment in a pornography case was released today)

आधिक वाचा-
तब्बल 20 वर्षांपूर्वी ‘गदर’मध्ये हॅन्डपंप उखाडून सनी देओलने घातला होता राडा; दिग्दर्शकाने सांगितले कसा लिहिला होता सीन
‘हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा