Tuesday, September 26, 2023

जरा ईकडे पाहा! सपना चौधरीने ‘एक दो तीन..’ गाण्यावर केला डान्स, चाहते म्हणाले, ‘माधुरी…’

छोट्या-छोट्या स्टेज शोमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सुप्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरी होय. ती आता खूप आलिशान आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर ती खूप प्रसिद्ध आहे. ‘बिग बॉस’पासून सपनाची लोकप्रियता गगणाला भिडली आहे. सपनाने या क्षेत्रात येण्यासाठी केलेले स्ट्रगलबद्दल सर्वांनाच माहिती आहे. सपनाने लहानपणापासूनच डान्स करायला सुरुवात केली होती. कारण वडिलांच्या निधनानंतर घराचा सर्व भार तिच्या खांद्यावर पडला होता.

सपना (Sapna Chaudhary) सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर फार मोठा चाहता वर्ग आहे. सपना सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षीव करत असतात. सपनाच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या व्हिडिओमध्ये सपना काळ्या रंगाच्या सूटमध्ये डान्स करताना दिसत आहे. ‘एक दो तीन घूंघट’ या गाण्यावर डान्स करत आहे. हे गाणे माधुरी दीक्षितच्या ‘एक दो तीन’ या प्रसिद्ध गाण्याचा रिमेक असल्याचे म्हणता येईल. जे हरियाणाची गायिका रुचिका जांगिडने गायले आहे. या गाण्यावर डान्स करून सपना हरियाणाची ‘माधुरी’ बनली आहे. तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या घराच्या छतावर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

काळ्या रंगाचा प्रिंटेड सूट परिधान करून स्कार्फ हलवताना दिसत आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. सपना चौधरीचा हा डान्स पाहून चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ काही वेळातच इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून आतापर्यंत 233 हजारहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. त्याचवेळी त्याच्या या व्हिडिओला 30 हजारांहून अधिक लोकांनी लाईकही केले आहे. (A video of Swapna Chaudhary dancing on the song Ek Doo Tri Ghunghat went viral)

अधिक वाचा- 
अभिनयातच नव्हे, तर अभ्यासातही अव्वल आहे सारा; ‘या’ अवघड विषयात 100 टक्के मिळवत केलं होतं तिने टॉप
बापाच्या पैशांवर जगणाऱ्या मुलींमधली नाही सारा; वर्षाकाठी छापते ‘एवढे’ कोटी, एका सिनेमासाठी घेते ३ कोटी

हे देखील वाचा