Thursday, June 13, 2024

जेव्हा सपना चौधरीने पहिल्यांदा केलेला स्टेज तोड डान्स, चाहत्यांनी केली होती तुडुंब गर्दी- व्हिडिओ

फक्त हरियाणापुरती मर्यादित न राहता आपल्या डान्सने जगभरात प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री आणि डान्सर म्हणजे सपना चौधरी होय. सपनाला आज कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. तिचे शो हरियाणाच्या बाहेर राजस्थान, बिहारपासून देशाच्या कानाकोपऱ्यात होतात. तिच्या शोला हजारोंच्या संख्येने प्रेक्षक गर्दी करतात. तिच्या ‘तेरी आख्या का यो काजल’ या गाण्याव1रील डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर धूम असते. सपना चौधरीचा पहिला व्हिडिओ आणखीच जबरदस्त होता, ज्यात ती स्टेज तोड डान्स करताना दिसली होती. यानंतरच तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

‘ढाई लीटर दूध’ गाण्यावर सपनाचा धमाल डान्स
सपना चौधरी (Sapna Choudhary) हिच्या डान्सवर चाहते फिदा होतात. सपनाने तिच्या कारकीर्दीची सुरुवात स्टेज शोपासून केली होती. ती गायिका बनण्यासाठी आली होती, पण ती परफॉर्मर बनली. मजबुरीमुळे एकदा स्टेजवर परफॉर्म करावे लागले होते आणि तिचा तो परफॉर्मन्स इतका जबरदस्त होता की, तिला स्टेजवर पाहण्यासाठी तुडुंब गर्दी होऊ लागली. यादरम्यान सपनाने स्टेजवर ‘ढाई लीटर दूध’ (Dhai Littre Doodh) गाण्यावर डान्स केला होता. या डान्सची चर्चाही सर्वदूरपर्यंत पसरली.

या व्हिडिओने सपनाला बनवले हिट
असे म्हटले जाते की, या एका व्हिडिओने सपनाला हिट केले होते. त्यानंतर ती हरियाणात होणाऱ्या स्टेज शोचा जीव की प्राण बनली. प्रत्येक कार्यक्रमात ती दिसू लागली आणि पाहता पाहता प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. यानंतर काही वर्षांमध्ये तिच्या आयुष्यात ‘तेरी आख्या का यो काजल’ (Teri Aakhya Ka Yo Kajal) हे गाणे आले. हे गाणे इतके हिट झाले की, आजही अनेकांच्या ओठांवर आहे.

सपना जिथे जाते, तिथे तिला या गाण्यावर डान्स करण्याची विनंती केली जाते. इतकेच नाही, तर लग्न समारंभामध्येही हे गाणे वाजतेच वाजते. विशेष म्हणजे, ज्यावेळी सपना ‘बिग बॉस’ (Bigg Boss) शोच्या घरात गेली, तेव्हाही हे गाणे वाजले होते. यावेळी हिना खान हिने सपनासोबत डान्स केला होता. (dancer and actress sapna choudhary first hit stage performance on dhai litre doodh song see here)

हेही वाचा-
टीजरसह ‘Don 3’ची घोषणा, शाहरुखच्या जागी ‘हा’ अभिनेता बनणार डॉन? नेटकरी म्हणाले, ‘नो एसआरके नो डॉन’
काळीज तोडणारी बातमी! बॉलिवूडच्या प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

हे देखील वाचा