Sunday, April 14, 2024

जेव्हा रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते 10 रुपये; पुढे जे झाले, त्याने तुम्हीही व्हाल हैराण

सुपरस्टार रजनीकांत यांना ’67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यामध्ये प्रतिष्ठित ‘दादासाहब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना चित्रपटसृष्टीतील पाच दशकांपासून त्यांच्या दमदार कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला आहे. रजनीकांत यांच्या जीवनाशी संबंधित असाच एक किस्सा आहे, जो तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल आणि त्याच्यासोबत त्यांच्या चांगुलपणाबद्दल तुम्हालाही कळेल.

आपल्या सहकाऱ्यांसोबत गेले मंदिरात
एकदा रजनीकांत यांना एका महिलेने भिकारी समजले होते. जरी ते आता ‘थलायवा’ या नावाने प्रसिद्ध असले, तरीही त्यांना कोण भिकारी समजू शकतो का? या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट त्यांच्याबाबत खरोखर घडली आहे. ही गोष्ट जवळ- जवळ 14 वर्षापूर्वी 2007मध्ये घडलेली आहे. यावेळी त्यांचा ‘शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई आणि एक नवीन रेकॉर्ड केला होता. जसे सगळे कलाकार चित्रपट यशस्वी झाला की, एक पार्टी करतात, तसेच ते ‘शिवाजी’ चित्रपट यशस्वी झाल्यामुळे खूप आनंदाने आपल्या सहकाऱ्यांसोबत मंदिरात गेले होते.

म्हाताऱ्या माणसाच्या पोशाखात पोहोचले मंदिरात
मंदिरात गेल्यावर कोणी ओळखू नये, म्हणून त्यांनी त्यांचा पूर्ण लूक बदलला होता. ते अगदी म्हाताऱ्या माणसासारखे तयार झाले होते. मात्र, त्यांच्या सिक्युरिटी टीमला माहिती होते की, जर कोणी रजनीकांत यांना ओळखले, तर गर्दी नियंत्रित करणे खूप कठीण होईल. त्यामुळे मेकअप आर्टिस्टने त्यांचा लूक आणि पोशाख हा म्हाताऱ्या माणसासारखा केला होता.

जेव्हा ते साधे कपडे घालून मंदिराच्या पायऱ्या चढत होते, त्यावेळी त्यांच्यासोबत एक महिला देखील पायऱ्या चढत होती. त्या महिलेने जेव्हा त्यांना बघितले, तेव्हा तिला असे वाटले की, खूप थकलेला म्हातारा आहे आणि त्याची तबेत ठीक नाहीये. त्यामुळे तिने भिकारी समजून दहा रुपयाची नोट काढून रजनीकांत यांना दिली होती.

काही न बोलता दहा रुपयांची नोट ठेवून घेतली
यानंतर असे काय घडले, याची तुम्हाला कल्पना देखील नसेल. त्यांनी ती नोट काही न बोलता आपल्या खिशात ठेवून घेतली आणि मंदिरामधील देवाच्या दर्शनासाठी गेले. आपल्या खिशातील पर्स काढून आहे तेवढे पैसे त्यांनी देवासमोर ठेवले. तीच महिला तिथे थांबून सगळं पाहत होती. नंतर तिने त्यांना खूप निरखून पाहिले, तेव्हा तिला समजले की, हे कोणी दुसरे नाही, तर सुपरस्टार रजनीकांत आहेत.

त्यावेळी ती धावत, धावत त्यांच्याकडे गेली, त्यांची माफी मागितली आणि म्हणाली, “मला माहित नव्हते की, ते तुम्ही आहात म्हणून, मला माझे दहा रुपये परत करा.” यावेळी अभिनेते म्हणाले की, “तुमचे दहा रुपये माझ्यासाठी देवाचे आशीर्वाद आहेत. तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या आणि माझ्यावर प्रेम करा.”

रजनीकांत यांनी आतापर्यंत ‘शिवाजी: द बॉस’, ‘दरबार’, ‘रोबोट’, ‘2.0’, ‘कबाली’, ‘काला’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. (a women misunderstand rajinikanth as beggar and handed 10 rupees)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘सुपरस्टार’ शब्द देखील छोटा वाटावा असे स्टारडम मिळवणारे रजनीकांत अभिनयात आले तरी कसे?
दोन हजार रुपयांपासून कमाईला सुरुवात करणारे रजनीकांत आज आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

हे देखील वाचा