प्रसिद्ध टिव्ही अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्या ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या १५ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून याच कार्यक्रमाने आदेश बांदेकर यांना आदेश भावोजी ही नवी ओळख मिळवून दिली आहे. नुकताच आदेश बांदेकर यांनी या कार्यक्रमानिमित्त एका ९९ वर्षाच्या आजींची भेट घेतली आहे. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाची महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता आहे. या कार्यक्रमाद्वारे आदेश बांदेकर राज्यात अनेक ठिकाणी फिरत असतात. महिलांमध्ये या कार्यक्रमाची विशेष क्रेझ आहे. या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. याचाच प्रत्यय त्यांच्या एका पोस्टमधून येत आहे. ज्यामध्ये त्यांनी ९९ वर्षांच्या आजींची भेट घेतल्याचे सांगितले आहे. या आजी होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या आणि आदेश बांदेकर यांच्या जबरा फॅन आहेत.
या ९९ वर्षांच्या आजीबाई सांगलीच्या रहिवासी असून त्या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या मोठ्या चाहत्या आहेत. त्या हा कार्यक्रम न चुकता पाहतात. त्या या कार्यक्रमाच्या इतक्या चाहत्या आहेत की कार्यक्रम लागल्यानंतर त्या आदेश बांदेकरांसाठी गाणीही गातात. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जो पाहून आदेश बांदेकर यांनी त्यांना भेटण्याचे आश्वासन दिले होते. हा दिलेला शब्द पाळत त्यांनी या आजीबाईंची सांगलीमध्ये जाऊन भेट घेतली. आदेश बांदेकर यांना पाहून या आजीबाईंचा आनंद पाहण्यासारखा होता. आदेश बांदेकर यांनी आजीबाईंसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- कमल हसनच्या ‘विक्रम’ चित्रपटाने ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘मेजर’ला टाकले मागे, या यादीत आहे अव्वल स्थानावर
- फाटलेल्या कपड्यातील अक्षय कुमारचा कधीही न पाहिलेला फोटो समोर; प्रेक्षक म्हणाले, ‘गुटख्याची जाहिरात केली तर…’
- IRSAL MARATHI MOVIE : ‘या’ दिवशी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘इर्सल’ चित्रपट होणार चित्रपटगृहात दाखल










