Friday, July 12, 2024

‘होम मिनिस्टर’च्या अकरा लाखाच्या पैठणीमुळे आदेश भाऊजी आले अडचणीत, नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आज घराघरात प्रसिद्ध आहे. गेली १८ वर्ष हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या कार्यक्रमात आत्तापर्यंत असंख्य महिलांनी आणि जोडप्यांनी सहभाग घेतला आहे. सर्वच क्षेत्रातील आघाडीच्या महिलांचा सन्मान करण्याचे कार्य या मालिकेतून अनेक वर्ष सुरू आहे. आता १ एप्रिलपासून हा कार्यक्रम महामिनिस्टर या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये विजेत्याला तब्बल ११ लाखाची साडी देण्यात येणार आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र या साडीच्या किमतीवरुन नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, होम मिनिस्टर हा आदेश बांदेकरांचा कार्यक्रम टिव्हीवरील सर्वात यशस्वी कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांंच्या मनातील सर्वात आवडता कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. सध्या हा कार्यक्रम नवीन ढंगात येणार आहे, ज्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये विजेत्या महिलेला ११ लाखाची साडी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही साडी महीगडे हिरे जडीत असणार आहे. मात्र या साडीच्या किमतीवरुन नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तशा प्रतिक्रिया या सोशल मीडिया पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

या साडीच्या किमतीवर नाराजी व्यक्त करताना “अनेकांनी गरज आहे तिथे पैसे वापरा”, “११ लाखाची साडी घालून कोण मिरवणार आहे”, “महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ आहे तिथे पैसे वापरा”, “सध्या गरीबांना पैसे नाहीत, सुख सुविधा नाहित तिकडे खर्च करा” असे सल्ले दिले आहेत. तर काही जणांनी “११ लाखाची साडी घालून कोणी हल्ला केला तर”, त्यापेक्षा “११ लाख रुपये रोख द्या’ असेही सुचवले आहे. त्यामुळे या ११ लाखाची साडी आयोजकांना चांगलेच अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा