Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीने मुलीसोबत केला गाण्याचा व्हिडिओ शेअर, चाहत्यांनी पाडला कौतुकाचा पाऊस

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीने मुलीसोबत केला गाण्याचा व्हिडिओ शेअर, चाहत्यांनी पाडला कौतुकाचा पाऊस

मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते‘ ही एक ट्रेडिंग मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र लेखकाने उत्कृष्टरित्या रेखाटले आहे. तसेच मालिकेची कहाणी देखील खूप वेगळी आणि वास्तविक आहे. मालिकेची खासियत म्हणजे मालिकेतील प्रत्येक पात्राला त्याची एक विशेष ओळख आणि स्थान आहे.

यातील मुख्य भूमिकेत असणारी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले (madhurani gokhale) हिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेतील तिच्या समंजस आणि विचार पात्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मालिकेत आपण अरुंधतीला अनेकवेळा गाणे गाताना पाहिले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का. वैयक्तिक आयुष्य देखील ती एक खूप गायिका आहे. अशातच मधुराणीने तिच्या मुलीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Aai kuthe kay karte fame actress madhurani Gokhale share her singing video on social media)

मधुराणीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, त्या दोघीही ‘बडे अच्छे लगते है’ हे गाणे गात आहेत. दोघीही अत्यंत सुरात हे गाणे गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “बडे अच्छे लगते है स्वरूसोबत.” तिच्या मुलीचे नाव स्वरा हे आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत आणि त्यांच्या या गाण्याचे कौतुक करत आहेत.

मधुराणी ही सध्या घराघरात पोचलेली अभिनेत्री आहे. तिच्या मालिकेतील अरुंधती या पात्राने सगळ्यांना भुरळ घातली आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे अनेक भाषांमध्ये रिमेक मालिका चालू आहेत. हिंदीमध्ये देखील या मालिकेचा रिमेक चालू आहे. त्या मालिकेचे नाव ‘अनुपमा’ हे आहे. खास गोष्ट म्हणजे सगळ्या भाषांमध्ये या मालिकेची टीआरपी सर्वात जास्त आहे.

हेही वाचा :

विराट कोहलीने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनुष्का शर्माने सोशल मीडियावर केली भावुक पोस्ट शेअर, वाचा

‘आयरा खानला हात लावू नकोस” नुपूर शिखरेला मिळाली धमकी, यावर त्याने व्हिडिओ शेअर करत दिला रिप्लाय

जान्हवी कपूरने बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग

 

हे देखील वाचा