खास मैत्रिणीच्या लग्नात आलीयाचा ‘गेंदा फूल’वर डान्स, गर्ल्स गँगबरोबर लावले जोरदार ठुमके


बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आणि डान्सने सगळ्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री आलिया भट्ट. अगदी कमी कालावधीत तिने चित्रपटसृष्टीत तिची वेगळीच छाप पाडली आहे. आलियाने नुकतीच तिच्या एका मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती. त्या लग्नाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच तिने तिचा एक डान्स व्हिडिओ देखील प्रेक्षकांसाठी शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती गर्ल्स गँगसोबत डान्स करताना दिसत आहे.

आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटाची शूटिंग थांबली आहे. त्यामुळे ती तिची मैत्रिणी रिया खुराणाच्या लग्नालाला जयपूरला गेली होती. लग्नातील व्हिडीओ आणि फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, आलिया तिच्या मैत्रिणींसोबत खूप मज्जा मस्ती करताना दिसत आहे. तिने जॅकलिनच्या गेंदा फूल या गाण्यावर डान्स केला आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा डान्स खूपच आवडला आहे. आलिया भट्टच्या एका फॅन क्लबने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने जलेबीबाई या गाण्यावर देखील डान्स केला आहे.

आलियाच्या डान्ससोबतच तिच्या ड्रेसने देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने या लग्नात एक स्टायलिश लेहेंगा घातला होता. त्याचा रंग गुलाबी होता. शिवाय काही फोटोजमध्ये ती नारंगी रंगाच्या साडीमध्ये दिसली आहे. तिच्या या फोटोला फॅन्सकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

आलियाने मागे एकदा इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिने एका व्यक्तीचा हात धरला होता. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहले आहे की,” खूप आठवण येतेय.”

आलियाने इथे कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही केला. पण तिचे सगळे फॅन्स असा अंदाज लावत आहे की, हा हात रणबीर कपूरचा आहे. रणबीरला कोरोना प्रादुर्भाव झाला आहे आणि तो घरातच क्वारंटाइन आहे. त्यानंतर आलियाने देखील कोरोना टेस्ट केली होती. पण ती निगेटिव्ह आली.


Leave A Reply

Your email address will not be published.