Monday, June 24, 2024

शॉर्ट्स घालून मंदिरात गेल्याने अंकिता लोखंडे झाली ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘हिला वेड लागलंय’

अभिनेत्री अंकिता लोखंडेचे(Ankita Lokhande) स्टार्स शिखरावर आहेत. अंकिता संदीप सिंगच्या वेब शोमध्ये दिसणार आहे. यामध्ये ती ‘आम्रपाली’ची भूमिका साकारणार आहे. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच अंकिता तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. अंकिता अनेकदा मीडियामध्ये स्पॉट केली जाते. आता अलीकडेच अंकिताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यासाठी तिला टीकेलाही सामोरे जावे लागत आहे.

अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 17’ फेम अंकिता लोखंडेला नुकतीच मुंबईत फिरताना दिसली आणि ती पापाराझींना सांगताना दिसली की, ती एका मंदिरात आशीर्वाद घेऊन घरी परतत आहे. मात्र, अभिनेत्रीने मंदिरात परिधान केलेल्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

आता इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये अंकिता मोठ्या आकाराचा टी-शर्ट आणि शॉर्ट्स परिधान करताना दिसत आहे. पॅप्सने अभिनेत्रीला घेरले आणि तिच्या हाताच्या दुखापतीबद्दल विचारले तेव्हा अभिनेत्री “अरे जाने दो यार, मंदिर आयी हूँ मैं” असे म्हणताना ऐकू आली.

अंकिताचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला मंदिरात शॉर्ट्स घातल्याबद्दल विचारणा केली. एका यूजरने लिहिले की, असे कपडे घालून मंदिरात कोण येते? तर दुसऱ्याने लिहिले, “मंदिरात चड्डी घालून, व्वा!” आणखी एका युजरने लिहिले की, “ती आधीच वेडी होती की बिग बॉस न जिंकल्याने तिला धक्का बसला आहे, की ती अशी कृत्ये करत राहते.”

अंकिता लोखंडेच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अखेरची रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिने यमुनाबाईची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवले तिचा आत्मविश्वास; म्हणाली, ‘यामुळे मी स्वतःला प्रेसेंट करते’
लग्नामुळे ट्रोल केल्याने भडकला अब्दू रोजिक; म्हणाला, ‘मला खुश राहण्याचा अधिकार नाहीये का?’

हे देखील वाचा