मागच्या काही काळापासून हिंदी सिनेसृष्टीचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सतत चर्चेत आहे. वैयक्तिक गोष्टी असो किंवा चित्रपटाशी संबंधित असो, आमिर सध्या मोठ्या प्रमाणावर प्रकाशझोतात आला आहे. सध्या आमिर लडाखमध्ये त्याच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा ‘लालसिंग चड्ढा’चे शेवटचे शूटिंग पूर्ण करत आहे.
मात्र यातच एका ट्विटर यूजरने ‘लालसिंग चड्ढा’च्या संपूर्ण टीमवर लडाखला प्रदूषित करण्याचा आरोप लावला आहे. आमिर खान किरण राव आणि नागा चैतन्य यांच्यासह संपूर्ण टीम सध्या लडाखमध्ये सिनेमाचे शेवटचे शेड्युल पूर्ण करत आहे. या यूजरने लडाखमधील वाखा गावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. याच गावात चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वाखा गाव संपूर्ण कचऱ्याने व्यापले आहे. या गावात सातत्याने गाड्यांची ये-जा असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. शिवाय प्लास्टिकच्या बाटल्या, अन्य कचरा सर्वत्र फेकलेला दिसत आहे. या गावाला दूषित करण्यामागे चित्रपटाच्या टीमचा हात असल्याचे सांगितले जात आहे.
This is the gift Bollywood star Amir Khan's upcoming movie Lal Singh Chada has left for the villagers of Wakha in Ladakh.
Amir Khan himself talks big about environmental cleanliness at Satyamev Jayate but this is what happens when it comes to himself. pic.twitter.com/exCE3bGHyB— Jigmat Ladakhi ???????? (@nontsay) July 8, 2021
या युजरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “अभिनेता आमिर खानचा आगामी सिनेमा लालसिंग चड्ढा वाखा गावातील लोकांसाठी हे गिफ्ट सोडून गेला आहे. आमिरने स्वतः सत्यमेव जयतेमध्ये पर्यावरण स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या होत्या, मात्र आता स्वतःवर आल्यावर असेच होते.” या आरोपावर आमिर खान किंवा ‘लालसिंग चड्ढा’च्या टीमकडून अजूनपर्यंत कोणतेही उत्तर आलेले नाहीये. तत्पूर्वी नागा चैतन्य नुकताच चित्रपटाच्या टीमसोबत पोहचला आहे. त्याने सेटवरून आमिर, किरण यांच्यासोबतच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
आमिर खानने नुकताच त्याची दुसरी बायको किरण रावला घटस्फोट दिला आहे. या दोघांनी काहीच दिवसांपूर्वी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत त्यांचा हा निर्णय जाहीर केला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-