Thursday, July 18, 2024

का फिरलेतं आमिर खानचे ग्रह? बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने पाच वर्षात मागितली तीन वेळा माफी

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या वादानंतर बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानने (Aamir Khan) काही दिवसांनी माफी मागितली आहे. गुरुवारी, अभिनेत्याच्या प्रॉडक्शन हाऊसने मिछमी दुखनाम उत्सवादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला. ज्यात एक व्यक्ती  “आपण सर्व माणसं आहोत, आणि चुका माणसांकडूनच होत असतात, माझ्यामुळे तुमचे मन कोणत्याही प्रकारे दुखावले गेले असेल, तर मी तुमची माफी मागतो.” असे म्हणताना दिसत आहे. आमिर खानने आपल्या चुकांची जाहीर माफी मागण्याची ही पहिलीच वेळ नाही. आमिर खानने गेल्या पाच वर्षांत तीनदा माफी मागितली आहे.  पाहूया का अभिनेता आमिर खानवर माफी मागण्याची वेळ आली. 

ठग्स ऑफ हिंदोस्तान फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने नोव्हेंबर 2018 मध्ये व्हिडिओ रिलीज करून प्रेक्षकांची माफी मागितली होती. तो म्हणाला होता, “आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले, खरच आम्ही आमच्या प्रयत्नात कोणतीही कसर सोडली नाही, पण तरीही कुठेतरी आमच्याकडून चूक झाली आहे. काही लोकांना चित्रपट आवडला आहे आणि आम्ही त्यांचे आभार मानू इच्छितो. आम्हाला आनंद आहे की काही लोकांना चित्रपट आवडला पण असे खूप कमी लोक आहेत. बहुतेक लोकांना चित्रपट आवडला नाही आणि आम्हाला याची जाणीव होते. नक्कीच आमची कुठेतरी चूक झाली आहे. जी काही चूक झाली त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो.

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा याआधी KGF: Chapter 2 सह थिएटरमध्ये येणार होता. आमिर खानने याची घोषणा करताना तो म्हणाला होता की, “मी कधीही माझ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख त्याच दिवशी निवडत नाही ज्या दिवशी दुसऱ्या निर्मात्याचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण, ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये मी एका शीखची भूमिका करत आहे, त्यामुळे आम्ही आमचा चित्रपट बैसाखीला म्हणजेच १४ एप्रिलला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. मला आणि माझ्या टीमला वाटले की ही रिलीजची सर्वात योग्य तारीख असेल. नवीन तारखेची घोषणा करण्यापूर्वी, मी निर्माते विजय किरागंडूर, मुख्य अभिनेता यश आणि KGF: Chapter 2 चे दिग्दर्शक प्रशांत नील यांची माफी मागितली.

हेही वाचा – लग्नानंतर दोन वर्षातच कोर्टात पोहोचली लवस्टोरी, लोकप्रिय अभिनेत्रीची पतीविरोधात तक्रार दाखल
केजीएफच्या निर्मात्यांची तर कधी प्रेक्षकांची, ३ वेळा आमिर खानने मागितली आहे माफी
लग्नानंतर १५ दिवसातच सॅम बॉंबेला खायला लागली होती जेलची हवा, पत्नी पूनम पांडेने केले होता हा गंभीर आरोप

 

हे देखील वाचा