Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

दंगल गर्ल फातिमा सना शेख करतीये ‘या’ गंभीर आजाराचा सामना; फोटो शेअर करत दिली माहिती

बॉलिवूडची दंगल गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फातिमा सना शेख(Fatima Sana Shaikh) हिने नुकताच खुलासा केला आहे की ती एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्या आजाराचं नाव ‘अपस्मार'(Epilepsy) असे आहे. ‘दंगल’ या चित्रपटासाठी ट्रेनिंग सुरू असताना तिला एपिलेप्सीचं निदान झालं. या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी फातिमाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करून याबद्दल सांगितलं आहे. ‘एपिलेप्सी जागरुकता महिना’निमित्त फातिमाने इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने एपिलेप्सी संदर्भात चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितलं आणि त्याची उत्तरं मोकळेपणे दिली.

सोशल मीडियावर एका फॉलोअरने ‘एपिलेप्सीचा सामना कसा करतेय’, असा प्रश्न एका युजरने तिला विचारला. त्यावर ती म्हणाली, ‘कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि बिजली यांच्याकडून मला चांगली साथ मिळतेय. काही दिवस चांगले असतात, तर काही फार चांगले नसतात.’ यासोबतच तिने लिहिले, ‘काही दिवस चांगले असतात पण काही नसतात.’

 

View this post on Instagram

 

एपिलेप्सीचं निदान कधी झालं, असा प्रश्न दुसऱ्या युजरने तिला विचारला. त्यावर तिने लिहिलं, ‘दंगल या चित्रपटासाठी ट्रेनिंग घेताना मला एपिलेप्सीचं निदान झालं. त्यावेळी मला आकडी आली आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी थेट रुग्णालयात होते. तेव्हा मला समजलं की एपिलेप्सी नावाची पण गोष्ट असते. फातिमा म्हणाली, ‘पहिली पाच वर्षे मी नाकारत गेले पण आता मी त्याचा स्वीकार केला आहे.’

अपस्मार आल्यावर एखादी व्यक्ती एकटी असेल तर काय करावं, कामावर असताना कोणती विशेष काळजी घेते, सतत त्याविषयीची मनात भिती असते का, एपिलेप्सीमुळे इतर कोणती कामं करण्यापासून रोखलं जातं अशी विविध प्रश्न चाहत्यांनी फातिमाला विचारली. फातिमाने त्याची सविस्तर उत्तरं नेटकऱ्यांना दिली.

नोव्हेंबर महिन्यात एपिलेप्सीबद्दल जनजागृती करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जातात. यामुळेच फातिमा सना शेख एपिलेप्सीनेही तिच्या आजारावर चाहत्यांशी मोकळेपणाने बोलले आहे. चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना अभिनेत्रीने उत्तरे दिली. वारंवार अपस्मार येणं हे प्रमुख लक्षण असलेल्या दीर्घकालीन आजाराला ‘अपस्मार’ असं म्हणतात. एकूण जागतिक लोकसंख्येपैकी 0.3 टक्के ते 0.5 टक्के लोक अपस्माराने ग्रासलेले आढळतात.(aamir khan dangal girl fatima sana shaikh suffering from mirgi epilepsy actress told about serious disease)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नुसरत भरुचाचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो
बिग बॉस फेम गोरी नागोरी अडकणार विवाह बंधनात; बाहेर पडताच दिली चाहत्यांना गुड न्यूज

हे देखील वाचा