Tuesday, March 5, 2024

बिग बॉस फेम गोरी नागोरी अडकणार विवाह बंधनात; बाहेर पडताच दिली चाहत्यांना गुड न्यूज

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’ याच्या नवीन सिजनमध्ये रोज काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे. बिग बॉस 16 (bigg Boss 16) घरात गोरी नागोरी(Gori Nagori) हिने स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. ‘हरयाणाची शकीरा’ म्हणून ओळखली जाणारी गोरी नागोरीचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र वीकेंड का वारमध्ये ती बिग बॉसच्या घरातून निघाली. गाैरी नागोरीच्या चाहत्यांना खूप दुःख झाले की, ती या शोमध्ये दिसणार नाही. त्यांच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे. पण, घराबाहेर काढल्यानंंतर अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा खुलासा केला आहे.

गोरी नागोरी लवकरच करणार लग्न
गोरी नागोरी गेल्या अनेक वर्षांपासून सनी चौधरीला डेट करत आहे. अलीकडेच मध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोरी नागोरीने ही बातमी शेअर करत सांगितले की, लवकरच लोकांना गोड बातमी देणार आहे. गोरी म्हणाली,’इंशाअल्लाह, लवकरच चांगली बातमी येईल.’ ‘हमरी शादी में’ हे गाणेही तिने गायले आहे. यावरून गोरी नागोरी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

View this post on Instagram

 

शोमधून बाहेर पडताच घोरी नागोरीने माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरे, साजिद खान आणि एमसी स्टॅनची मैत्री खोटी असल्याचे सांगितले होते. गोरी म्हणाली, “या लोकांनी शेवटी रंग दाखवला आहे.” गोरीची बिग बॉसच्या घरात शिव, साजिद आणि एमसी स्टॅनशी खूप चांगली मैत्री होती, पण निमृत त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर गोरीने सौंदर्या आणि गौतमशी मैत्री केली. याचा शिव, स्टॅन आणि साजिद यांना खूप राग आला. बिग बॉसच्या घराबाहेर जाण्यापूर्वी तिचे आणि साजिदमध्ये जोरदार भांडण झाले होते.

गोरीच्या घराबाहेर जाण्यामुळे खुश होता साजिद
साजिद आणि गोरी यांच्यात पूर्वी खूप मतभेद झाले होते. गोरीला साजिदची स्वभाव आवडत नव्हता. जेव्हा गोरी घराबाहेर निघाली तेव्हा साजिदला खूप आनंद झाला. तो आनंदाने नाचत होता.(biggboss 16 fame gori nagori gave hint about her wedding with boyfriend sunny choudhary)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आंटी तर फुल्ल फॅशेनमध्ये;’ म्हणत, मलायाका अरोराची ट्रोलर्सने उडवली खिल्ली

हॉट! अभिनेत्री हुमा कुरेशीने फ्लॉन्ट केला सिंपल लुक, नारंगी रंगात दिसतेय ऑरेन्ज

हे देखील वाचा