Wednesday, October 9, 2024
Home बॉलीवूड ‘सीतारे जमीन पर’मधून परतणार आमि खान ; म्हणाला, ‘हा चित्रपट तुम्हाला सामाजिक संदेश देईल’

‘सीतारे जमीन पर’मधून परतणार आमि खान ; म्हणाला, ‘हा चित्रपट तुम्हाला सामाजिक संदेश देईल’

अभिनेता आमिर खान (Aamir khan) सध्या खूप चर्चेत आहे. तो त्याची माजी पत्नी किरण रावच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘लापता लेडीज’च्या प्रमोशनदरम्यान अभिनेता त्याच्या चित्रपटाबद्दल मीडियाशी मोकळेपणाने बोलताना दिसला.

आमिर खान बॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. जेव्हा तो एखादा चित्रपट साईन करतो तेव्हा त्या चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या रंगात तो पूर्णपणे रंगून जातो. अलीकडेच मीडियाशी संवाद साधताना अभिनेता म्हणाला, ‘सितारे जमीन पर, तारे जमीन पर या चित्रपटापेक्षा हा चित्रपट खूपच वेगळा असणार आहे. होय, हा चित्रपट तारे जमीन वरचा सिक्वेल नक्कीच आहे, पण हा चित्रपट तुम्हाला रडवणार नाही. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद होईल. एक मनोरंजक चित्रपट असण्यासोबतच हा एक सामाजिक संदेश देखील देणार आहे.

2007 मध्ये आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. या चित्रपटात आमिर खान शिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता. आता आमिरने त्याचा आगामी चित्रपट ‘सीतारे जमीन पर’चे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमिर म्हणाला, ‘सितारे जमीन परमध्ये मी तुम्हा सर्वांना एका वेगळ्या रुपात भेटणार आहे. हे पात्र खूप भावनिक आहे. तुम्हाला हा चित्रपटही आवडेल अशी आशा आहे.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, येत्या काही दिवसांत आमिर खान ‘लाहोर 1947’मध्ये छोटी भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय आमिर ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्साह आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सतीश कौशिक यांची आठवण काढत अनिल कपूर झाले भावुक, दिवंगत मित्रासाठी लिहिली खास नोट
छान किती दिसते फुलपाखरू ! नेहा पेंडसेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा