Tuesday, July 9, 2024

Lal Singh Chadha | खरंच तू पर्फेक्शनिस्टंय! दुखापत होऊनही ‘हा’ तोडगा काढत आमिरने चालूच ठेवलं शूट

आमिर खानचा (Aamir Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ रिलीझसाठी सज्ज आहे. प्रेक्षकही याची चित्रपटगृहात येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात आमिर खान लाल सिंग चड्ढाची भूमिका साकारत आहे, जो त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध व्यवसायांमध्ये दिसणार आहे. त्यापैकी एक क्रॉस-कंट्री रनर देखील आहे.

‘लाल सिंग चड्ढा’च्या दीर्घकाळाची कल्पना प्रेक्षकांसाठी उत्साहवर्धक असताना, मुख्य भूमिकेत असलेल्या आमिर खानने सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान त्याच्या मर्यादा खूप पुढे ढकलल्या. आमिर खानने चित्रपटाच्या या लांबलचक सीक्वन्सचे शूटिंग सुरू केले, तेव्हा त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तरीही, सर्व अडचणींनंतरही आमिर खान मागे हटला नाही. यादरम्यान आमिर सतत पेनकिलर घेत होता, जेणेकरून त्याला धावण्यामुळे होणाऱ्या त्रासात आराम मिळावा. (aamir khan was injured during the shooting of the laal singh chaddha)

‘यामुळे’ मानली नाही हार
अखेर दुखापत असूनही आमिर खानने धावणे का निवडले? यामागचे कारण होते महामारी. खरं तर, कोविड १९मुळे, ‘लाल सिंग चड्ढा’चे शूटिंग आधीच खूप लांबले होते. अशा परिस्थितीत, दुखापतीमुळे चित्रपटाच्या या लांबलचक सीनचे शूट पुन्हा पुढे ढकलण्यात यावे, असे आमिरला वाटत नव्हते. शूट खूप ग्रिलिंग आणि ओव्हर टॅक्सिंग झाले असले तरी, त्याने हार मानली नाही आणि त्याचा सर्वोत्तम शॉट दिला.

‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचा ‘रनिंग सीन’ हा सर्वाधिक चर्चेत असलेला सीन आहे. यात, लाल सिंग चड्ढा वर्षानुवर्षे धावत जातो, भारतातील प्रत्येक सुंदर स्थानावरून जातो आणि त्याच्या आयुष्यातील आणखी एक मैलाचा दगड गाठतो.

आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव (Kiran Rao) आणि वायकॉम १८ स्टुडिओज निर्मित ‘लाल सिंग चड्ढा’, करीना कपूर (Kareena Kapoor), मोना सिंग (Mona Singh) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत रिमेक आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ ११ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा