बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रिसद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी नेहमीच समाजतील चालू घडामोंडींवर भाष्य करणारे चित्रपट बनवले आहेत. नुकतंच त्यांचा आगामी येणारा चित्रपट गांधी गोडसे: एक युद्ध लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून वादाच्या घेऱ्यात अडकला आहे. या चित्रपटामध्ये मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर देखिल मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. एका मुलाखतीदरम्यानं त्यांनी अभिनेता आमिर खान याच्या बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
अभिनेता आमिर खान (Amir Khan) स्टारर लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा बिग बजेट चित्रपट बॉक्सऑफिसवर दणक्यात आपटल्याने आमिर समोर मोठे अपयश आले होते. त्याला चित्रपटावर खूप आशा होती की, हा चित्रपट खूप भारी चालेल मात्र, बॉयकॉट मुळे हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला. यानंतर आमिरने करियरमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटुंबाला वेळ देता आला नाही म्हणून त्याने ब्रेक घेतला आहे. आता आमिरचं कमबॅक करण्यासाठी दिग्दर्शक राकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) सज्ज झाले आहेत.
राजकुमार संपोषी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, “माझ्याकडे चित्रपटाचा विषय आहे. ‘लाल सिंग चड्ढा’च्या वेळी आमची भेट होणार होती, पण त्यानंतर त्यांनी चित्रपटातून ब्रेक घेत असल्याचे जाहीर केलं. पण एखाद्या दिवशी भेटलो तर मी त्यांना गोष्ट सांगेन आणि त्यांचा ब्रेक लवकर संपवण्याचा प्रयत्न करेन.
View this post on Instagram
दिग्दर्शक राजकुमार यांच्या अंदाज अपना अपना (Andaz Apna Apna) या चित्रपटामध्ये आमिरने दमदार अभिनय केला होता, त्यासोबतच सलमान खान (Salman Khan) देखिल आमिरसोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला हा चित्रपट कळत क्लासिक म्हणून ओळखला जातो. आजही हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. यामधील कॉमेडी आणि डायलॉगने प्रेक्षकांना वेड लावले होते. राजकुमार यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक गाजणारे चित्रपट केले आहेत. या महिन्यात (दि, 26 जानेवरी) रोजी त्यांचा ‘गांधी गोडसे’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिस विरोधात दाखल केला मानहानीचा खटला
ज्येष्ठ रंगकर्मी तथा अभिनेते महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे दुःखद निधन