Saturday, June 29, 2024

अगदी प्रिंसेस दिसतेय! लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं आर्या आंबेकरचं सौंदर्य; एक नजर टाकाच

चित्रपटसृष्टीमध्ये ‘ब्युटी विद टॅलेंट’ खूप कमी अभिनेत्रींमध्ये पाहायला मिळते. यातीलच मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची गायिका आणि अभिनेत्री म्हणजे आर्या आंबेकर. आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावण्यासाठी आर्या नेहमीच सज्ज असते. ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’मधून नावारुपाला आलेली आर्या खूपच सुंदर दिसते. तिच्या अदा पाहून कोणीही स्वतःला तिच्या प्रेमात पडण्यापासून थांबवू शकत नाही. अशातच लाखोंना भुरळ घालणारे तिचे काही फोटो समोर आले आहेत.

आर्याने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे. तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिने कर्ली हेअर केले आहेत. लॉंग लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती अगदी प्रिन्सेससारखी दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तिचा चाहता वर्ग मोठा असल्याने, या फोटोवर अनेक कमेंट येत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “तुझ्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी माझा शब्दकोश कमी पडत आहे.” तसेच अनेकांनी या फोटोवर कमेंट करून तिच्या सौंदर्याचे वर्णन करत आहेत. (aarya ambekar looks like princess in red long dress)

खरतर तिचा हा लूक सारेगामापा या शोमधील आहे. आर्या सध्या झी मराठीवरील ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोचे परीक्षण करत आहे. ज्या शोने तिला ओळख निर्माण करून दिली, आज त्याच शोचे परीक्षण करणे ही आर्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे. या शोमध्ये तिच्यासोबत रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा भगवान, प्रथमेश लघाटे हे परीक्षकांच्या भूमिकेत आहेत.

आर्याने मराठी संगीत क्षेत्राला अनेक गाणी दिली आहेत, तिने ‘जरा जरा’, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘कितीदा नव्याने’, ‘ओ साजणा’ यासारखी गाणी गायली आहेत. यासोबतच तिने अनेक मालिकांचे टायटल सॉंग्स गायले आहेत. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा