अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सध्या त्याच्या आगामी ‘आश्रम ३’ या वेबसिरीजमुळे चांगलाच चर्चेत आहे. प्रेक्षकही या सिरीजची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. प्रकाश झा दिग्दर्शित या सिरीजमध्ये काशीपूरच्या बाबाच्या काळ्या कृत्याची शिक्षा त्याला मिळते की, सत्तेशी संगनमत करून तो पळून जातो हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. ही सिरीज ३ जूनला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉबी या सिरीजचे जोरदार प्रमोशन करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्याने त्याच्यासोबत घडलेला एक जुना प्रसंग शेअर केला.
त्याने सांगितले की, एकदा एका चाहतीने त्याला तीन मिनिटे धरून ठेवले होते आणि लवकर सोडलेच नाही. बॉबीने सांगितले की, या काळात त्याला या परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे समजत नव्हते. अभिनेत्याने सांगितले की, ही त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची गोष्ट आहे. तेव्हा तो खूप लाजाळू होता आणि चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केल्यावर तो अस्वस्थ व्हायचा. (aashram actor bobby deol made a shocking revelation of the woman)
बॉबीने ट्विंकल खन्नासोबत (Twinkle Khanna) १९९५ मध्ये ‘बरसात’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्कारही मिळाला. ‘गुप्त’, ‘और प्यार हो गया’, ‘सोल्जर’, ‘करीब’, ‘बादल’, ‘बिच्छू’, ‘अजनबी’, ‘हमराज’ आणि ‘यमला पगला दीवाना’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये त्याने अभिनेता म्हणून काम केले आहे. एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बॉबी म्हणाला, “मी खूप लाजाळू व्यक्ती आहे आणि त्या दिवसातही मी खूप लाजाळू होतो. मी खूप लहान होतो, त्यामुळे मी अस्वस्थ व्हायचो.”
एका घटनेबद्दल बोलताना बॉबी म्हणाला, “मला आठवतंय की मी एकदा पुण्यात एका प्रीमियरला गेलो होतो आणि त्यादरम्यान एका महिलेने मला पकडलं आणि बराच वेळ मला सोडलं नाही. मला कळत नव्हतं इथून कसं जायचं?… पण मी तिला धक्काही देऊ शकत नव्हतो. मला कळत नव्हतं काय करावं? मला वाटतं, अशा गोष्टी करिअरची सुरुवात करणाऱ्या सर्व कलाकारांच्या बाबतीत घडतात.”
बॉबी अखेरचा ‘लव्ह हॉस्टेल’मध्ये सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) आणि विक्रांत मॅसीसोबत (Vikrant Massey) दिसला होता. तो लवकरच एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणाऱ्या ‘आश्रम ३’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा