×

बॉबी देओलच्या ‘आश्रम’ सिरीजचा तिसरा सिजन येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेत्याने शेअर केली माहिती

सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचे (Bobby deol) करिअर बुडण्याच्या मार्गावर होते. नवीन कोणताही चित्रपट मिळत नसल्याने त्याची कारकिर्द संपुष्टात आली असेच प्रत्येकाने गृहित धरले होते. अशा वेळी तो ओटीटीकडे वळला जिथे त्याला अभिनयाची वेगळी शैली मिळाली. प्रकाश झा (prakash jha) यांच्या ‘आश्रम‘ (Ashram) या वेबसिरीजने त्याला पुनरागमन करण्यास मदत केली आणि एक नवीन ओळख दिली. या वेब सिरीजचा पहिला आणि दुसरा भाग प्रेक्षकांना खूप आवडला होता. लोक त्याच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळेच चाहत्यांची निराशा थोडी कमी करत मालिकेच्या निर्मात्यांनी त्याची एक छोटीशी झलक लोकांसोबत शेअर केली आहे.

अभिनेता बॉबी देओलची ‘आश्रम’ वेबसिरीज प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या सिरीजमुळे अभिनेता बॉबी देओलला नव्याने अभिनय जगतात ओळख मिळवून दिली. आश्रम सिरीजचा पहिला आणि दुसरा सिजन लोकप्रिय ठरल्यानंतर आता तिसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये बाबा निरालाची भूमिका साकारणाऱ्या बॉबी देओलने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. या सिरीजची पहिली झलक त्याने एका छोट्या व्हिडिओद्वारे लोकांना दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये फक्त 3 असे लिहिलेले दिसत आहे. आगीच्या ज्वाळाही दिसत आहेत. ही छोटी क्लिप पाहिल्यानंतर चाहते मात्र उत्सुक झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

टीझर रिलीज झाल्यानंतर त्याचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होईल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. टीझरवर चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने “आश्रम सीझन 3 साठी खूप उत्सुक आहे” असे लिहले आहे तर दुसऱ्या यूजरने “सुपरस्टार  सुपरहिट सिरीज पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही” असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान जितकी ही सिरीज लोकप्रिय ठरली तितकीच ती वादाच्या भोवऱ्यातही अडकलेली पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शूटिंगदरम्यान मालिकेवरून बराच गदारोळ झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही लोक शूटिंगच्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सेटची तोडफोड केली आणि दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post