‘… घर विकत घेणं अधिक बरं नाही का?’ आस्ताद काळेच्या ‘त्या’ पोस्टवर नेटकरी करतायेत कमेंट्सचा वर्षाव

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आस्ताद काळे (Aastad kale) हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. समाजातील अनेक घटनांवर तो त्याचे मत व्यक्त करत असतो. त्यामुळे त्याच्या सोशल मीडिया पोस्ट चांगल्याच चर्चेत असतात. अशीच एक त्याची पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही, परंतु, तरी देखील त्याचे चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहे.

आस्तदने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर केले आहे की, “रु.६० लाख deposit, आणि रु.१० लाख मासिक भाडं भरून राहाण्यापेक्षा घर विकत घेणं अधिक बरं नाही का? ता.क:- हे आकडे माझ्याशी संबंधित नाहीत.” त्याची ही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. (Aastad kale’s social media post viral on social media)

त्याच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “हाच प्रश्न मी बातमी वाचल्यापासुन विचारतोय? 1.8 करोडची उलाढाल. नाही म्हटल, तरी जुहुमध्ये उच्च प्रतीचे घर नक्कीच मिळेल, पण भाड्याची जागा ऐसपैस आहे म्हणून हा खटाटोप असेल. मिमी म्हणे.”

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4540032822785296&id=100003358684659

त्याच्या चाहत्याने मिमी म्हटल्यामुळे सगळे लक्ष बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननकडे जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, तिने अमिताभ बच्चन यांचा अंधेरी भागातील एक ड्युप्लेक्स फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. या घरासाठी क्रिती दर महिना १० लाख भाडे देणार आहे. सिक्युरिटीपोटी यासाठी तिने ६० लाख रूपये भरल्याची माहिती देखील आली आहे. अशातच आस्तादने ही पोस्ट केल्यामुळे सगळ्यांच्या नजरा क्रितीकडे जात आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेक गंमतीशीर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aastad Sunita Pramod Kale (@aastadkale)

आस्ताद हा टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. त्याने अनेक चित्रपटात देखील काम केले आहे. त्याला स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून खास ओळख मिळाली. त्याने ‘निवडुंग’, ‘लाठी’, ‘प्लॅटफॉर्म’, ‘निरोप’, ‘सरस्वती’, ‘मिशन पॉसिबल’, ‘निर्दोष’, ‘लग्न मुबारक’, यांसारख्या मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. तसेच तो सध्या ‘जाऊ नको दूर बाबा’ या मालिकेत काम करत आहे. आस्ताद हा ‘बिग बॉस मराठी २’ चा स्पर्धक देखील होता. या शोमध्ये तो फिनालेपर्यंत गेला होता. मागच्याच वर्षी त्याने त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबत लग्न केले आहे.

हेही वाचा :

‘मोठं घर पोकळ वासा, वारा जाई भसा भसा,’ उत्कर्षने दिला जिगरी मित्राला मोलाचा संदेश

‘बिग बॉस मराठी’ मधून महेश मांजरेकर घेणार माघार; ‘हा’ अभिनेता करणार शेवटचे दोन आठवडे होस्ट

‘कोई एसी तो ऑन करो भाई,’ अमृता खानविलकरच्या ग्लॅमरस लूकवर ‘ही’ अभिनेत्री देखील फिदा

 

 

Latest Post