‘मोठं घर पोकळ वासा, वारा जाई भसा भसा,’ उत्कर्षने दिला जिगरी मित्राला मोलाचा संदेश

‘बिग बॉस मराठी ३’  (Bigg Boss Marathi 3) हा शो संपायला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. घरात केवळ ७ स्पर्धक राहिले आहेत. यातून आता टॉप ५ निवडले जाणार आहेत. हा शो जसा संपत आला आहे तसा हा शो जास्तच रंगतदार झाला आहे. शोमध्ये आता अनेक बदल घडताना दिसत आहे. या आठवड्यात बिग बॉसचा वाढदिवस आहे. त्यामुळे बिग बॉसने घरातील स्पर्धकांना अनेक नवीन टास्क दिले आहेत. 

या घरात अनेकांची मैत्री झाली, तर अनेकांची मैत्री तुटली. घरात सुरुवातीपासून उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाने यांची मैत्री खूप घट्ट आहे. परंतु आता त्यांच्या मैत्रीत देखील फूट पडताना दिसत आहे. घरात एकमेकांना सल्ला देण्याचा टास्क आला आहे. या टास्कमध्ये कधी नव्हे ते उत्कर्ष जयला सल्ला देताना दिसणार आहे. याचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. (Bigg Boss Marathi 3 : Utkarsh shinde give advice to jay dudhane)

यावेळी उत्कर्ष जयला म्हणतो की, “जय मित्रा प्लीज मोठा हो, मी पणा सोडून दे. मोठं घर पोकळ वासा वारा जाई भसा भसा असं होऊन देऊ नको. राग आणि भीक माग ही म्हण लक्षात ठेव मित्रा. आपल्याकडे शक्ती आहे याचा अर्थ असा नाही की, आपण समोरच्याची लायकीच काढली पाहिजे.” यावर जय म्हणतो की, “यावर माझं एवढंच म्हणणं आहे की, टाळी एका हाताने वाजत नाही.”

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

यानंतर आता खरचं जय आणि उत्कर्षच्या मैत्रीत फूट पडेल का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. जय आणि उत्कर्ष यांनी जोडी सुरुवातीपासूनच सगळ्यांना खूप आवडते. या ९० दिवसाच्या प्रवासात त्यांच्यात कधीही भांडण झालं नाही. त्यांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. आता खेळाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन त्याच्यात झालेल्या या वादामुळे त्यांच्या चाहते चिंतेत आले आहेत.

हेही वाचा :

‘बिग बॉस मराठी’ मधून महेश मांजरेकर घेणार माघार; ‘हा’ अभिनेता करणार शेवटचे दोन आठवडे होस्ट

‘कोई एसी तो ऑन करो भाई,’ अमृता खानविलकरच्या ग्लॅमरस लूकवर ‘ही’ अभिनेत्री देखील फिदा

टेलिव्हिजनवरील ‘या’ दोन सह-कलाकारांनी बांधली लगीनगाठ, अभिनेत्याचे आहे दुसरे लग्न

 

 

Latest Post