‘कोई एसी तो ऑन करो भाई,’ अमृता खानविलकरच्या ग्लॅमरस लूकवर ‘ही’ अभिनेत्री देखील फिदा

मराठी मालिका, नाटक, चित्रपट, रियॅलिटी शो आणि हिंदी चित्रपटात काम करून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. (Amruta Khanvilkar) अभिनयासोबतच तिच्या डान्स कौशल्याने तिने अवघ्या महाराष्ट्राला तिच्या प्रेमात पाडले आहे. तिच्या सौंदर्याने लाखो मुलांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर देखील तिचे लाखोंमध्ये फॉलोवर्स आहेत. तिने ‘नटरंग‘ या चित्रपटात ‘वाजले की बारा’ गाण्यावर डान्स करून आख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या वेगवेगळ्या रूपाचे दर्शन ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना देत असते. असाच तिचा एक ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

अमृताने अलीकडेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा बॉडी फिटेड ऑफ शोल्डर कट ड्रेस घातला आहे. या ड्रेसची खासियत म्हणजे हा ड्रेस जरी बॉडी फिटेड दिसत असला, तरी देखील खालून हा ड्रेस नेट फ्रीलचा आहे. त्यामुळे तिचा हा लूक अगदी पाहण्याजोगा आहे. तिने कानात छोटेसे ईअरिंग घातले आहे आणि स्मोकी आय मेकअप करून हा ग्लॅमरस लूक पूर्ण केला आहे. (Amruta Khanvilkar share her glamorous photos on social media)

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

तिचा हा लूक अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाच्या रात्रीचा आहे. त्यावेळी ग्लॅमरस अशी थीम होती असे तिने एका फोटोमध्ये सांगितले आहे. एका आरशा समोरील फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “माझ्या आईला जर माझ्या सारखीच एखादी जुळी मुलगी असती, तर? नको मी एकटीच बास आहे.”

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

तिच्या या फोटोला अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक कलाकारांना देखील तिचा हा लूक खूपच आवडला आहे. अभिनेत्री पूजा सावंतने या फोटोवर “स्टनिंग,”अशी कमेंट केली आहे. तसेच मंजिरी ओक हिने कमेंट केली आहे की, “कोई एसी तो ऑन करो भाई.” अशाप्रकारे अनेक चाहते देखील तिच्या या लूकवर कमेंट करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताने २००४ साली ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर २००५ साली तिने ‘अदा’ आणि ‘टाईम बॉम्ब ९/१२’ या मालिकांमध्ये काम केले. तिच्या या पात्रांचे सर्वत्र कौतुक झाले. यानंतर २००६ साली तिला चित्रपटातून ऑफर आली. तिने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच वर्षी तिने ‘मुंबई सालसा’ या हिंदी चित्रपटात काम केले.

तिने २००७ साली ‘साडे माडे तीन’, ‘हॅट्रिक’, ‘कॉन्टॅक्ट’, ‘फुंक’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘गैर’, ‘नटरंग’, ‘झक्कास’, ‘धूसर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘सतरंगी’, ‘शाळा’, ‘आयना का बायना’, ‘हिंमतवाला’, ‘बाजी’, ‘वेलकम जिंदगी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बस स्टॉप’, ‘वन वे तिकीट’, ‘मलंग’, ‘वेल डन बेबी’ यांसारख्या चित्रपटात काम केले.

हेही वाचा :

टेलिव्हिजनवरील ‘या’ दोन सह-कलाकारांनी बांधली लगीनगाठ, अभिनेत्याचे आहे दुसरे लग्न

चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या धनुषला होता ‘या’ गोष्टीत रस; पण वडिलांच्या हट्टापायी धरली अभिनयाची वाट

शिव ठाकरे आणि वीणा जगतापचे झाले ब्रेकअप? शिवच्या ‘त्या’ उत्तराने रंगली चर्चा

 

Latest Post