Friday, July 12, 2024

कर्क रोगाशी लढा देणार्‍या पतीच्या प्रकृतीबद्दल विचारताच अभिज्ञा भावे झाली भावूक

अभिज्ञा भावे (Abhidnya bhave) ही मराठी मालिका क्षेत्रातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि खलनायकी भूमिकांनी अभिज्ञाने या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या चित्रपटांइतकीच ती सोशल मीडियावर प्रसिद्ध असते. आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांशी शेअर करत असते. मात्र अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे. याबद्दलच तिला विचारले असता अभिज्ञा भावूक झालेली पाहायला मिळाली.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिज्ञा भावे ही मराठी मालिका क्षेत्रात आपल्या खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा ती आपल्या चाहत्यांशी व्हिडिओ चॅटच्या माध्यामातून संवाद साधत असते. मात्र अभिनयात चर्चेत असणारी अभिज्ञा सध्या तिच्या पतीच्या प्रकृतीमुळे चिंतेत आहे. अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै कर्क रोगाच्या आजाराने त्रस्त आहे. अभिज्ञा आणि मेहूलच्या लग्नानंतर सुखी संसाराला सुरुवात होण्यापूर्वीच या आजाराचे निदान झाले होते.

त्यामुळे अभिज्ञावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. याबाबतची माहिती मेहुलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली होती. त्यामुळे या गोष्टीचा अभिज्ञाला चांगलाच धक्का बसला होता. तिने सोशल मीडिया पासूनही लांब राहणे पसंत केले होते. सध्या ती तू तेव्हा तशी या मालिकेत भूमिका करत आहे.

‘तु तेव्हा तशी’ मालिकेच्या सेटवरूनच तिने चाहत्यांशी लाइव्ह चॅट केले होते. यावेळी बोलता बोलता एका चाहत्याने कसा आहे मेहुलच्या प्रकृतीवर प्रश्न विचारला तेव्हा अभिज्ञा खूपच भावूक झालेली पाहायला मिळाली. यावेळी तिने स्वतःला सावरत तो पुढील दोन महिन्यात बरा होईल. अशी माहितीही तिने दिली. यावेळी अभिज्ञा च्या चेहर्‍यावर काळजीचे भाव उमटलेले पाहायला मिळाले. दरम्यान अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहूल पै 2021 मध्ये विवाह बंधनात अडकले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा