Wednesday, July 3, 2024

मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेकडून ‘रॉयल’ लग्नाचा व्हिडिओ पोस्ट, सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अभिज्ञा भावेने नवीन वर्षाचा मुहूर्त साधत मेहुल पै याच्यासोबत लग्नगाठ बांधली. मराठमोळ्या अभिज्ञाच्या लग्नाचे आणि लग्नाच्या आधी झालेल्या सर्व विधींचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. आता अभिज्ञाने तिच्या लग्नाचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

हा टिझर व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले, “६ जानेवारी २०२१. मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवसातील काही आनंदाचे, भावनिक आणि खास विशेष क्षण शेअर करत आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी खूप आभार.”

सध्या अभिज्ञाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सिद्धार्थ आणि मितालीच्या व्हिडिओनंतर अभिज्ञाने देखील तिच्या लग्नाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अभिज्ञाने पोस्ट केलेल्या पाच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये तिच्या लग्नापूर्वीच्या सर्व विधींपासून ते लग्न, रिसेप्शनपर्यंत सर्व लहान- मोठ्या क्षणांना तिने तिच्या चाहत्यांसोबत शेयर केले आहे.

या व्हिडिओमध्ये अभिज्ञा आणि मेहुल यांची जोडी अतिशय सुंदर दिसत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद देत हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिचा हा व्हिडिओ आतापर्यंत ९० हजारपेक्षा अधिक चाहत्यांनी पाहिला आहे.

अभिज्ञा तिच्या लग्नाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये अतिशय गोड आणि आकर्षक दिसत आहे. तिच्या या लग्नाला मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा-

अखेर विकेट पडली! अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा संपन्न; पाहा फोटो

नव्या वर्षाच्या पहिल्या वीस दिवसांतच मराठी सिनेसृष्टीतील चौथं लग्न, ‘या’ अभिनेत्रीने बांधली लगीनगाठ

मराठीतील आघाडीची अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी आज आहे अंथरुणाला खिळून

 

हे देखील वाचा