‘अक्षय कुमारला मीच स्टार बनवले, नाहीतर तो…’ लाईव्ह सेशनमध्ये गायक अभिजित भट्टाचार्य यांचा मोठा दावा


अभिजित भट्टाचार्य हे त्या दिग्गज गायकांपैकी एक आहेत, ज्यांच्या आवाजाची आजही संपूर्ण दुनिया दीवानी आहे. अभिजित भट्टाचार्य हे त्यांच्या गाण्यासोबतच इतर अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतात. मागील काही दिवसात त्यांनी ‘इंडियन आयडल’वर अमित कुमार यांच्या चाललेल्या वादात त्यांचे मत व्यक्त केले होते. त्यांचे असे म्हणणे होते की, हा मुळात वाद नव्हता. फक्त त्या गोष्टीला रंगवून सांगितले गेले आहे. आता अभिजित पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

नुकतेच अभिजित यांनी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या बाबतीत एक वक्तव्य केले आहे. अभिजित यांनी त्यांच्या लाईव्ह सेशनमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. यात त्यांनी असे सांगितले की, अक्षय कुमारला त्यांनीच एक मोठा स्टार बनवले आहे. या सोबतच त्यांनी अक्षय कुमारला गरिबांचा मिथुन चक्रवर्ती असे संबोधले. एवढंच नाही, तर त्यांनी सांगितले की, अक्षय आज जो काही मोठा कलाकार आहे, तो फक्त त्यांच्या गाण्यांमुळेच आहे.

अभिजित भट्टाचार्य यांनी सांगितले की, “मी स्टार्सची गाणी गाण्यासाठी जन्मलो आहे. हे महत्वाचं नाही, की मी किती चांगले गातो. जर ती व्यक्ती स्टार नसेल तर त्याला काहीच किंमत राहत नाही. एकीकडे शाहरुख खान आहे तर दुसरीकडे सुनील शेट्टी. शाहरुख खान एक स्टार आहे, तो जे बोलतो  त्याचा क्लास असतो. सुनीलसोबत एक रफ अँड टफ गोष्टी जोडलेल्या आहेत. जेव्हा सुनीलसाठी गाणी गावी लागतात, तेव्हा एकदम आक्रमक आणि जंगली व्हावे लागते. मी सुनील आणि शाहरुख या दोघांसाठी गाणी गायली आहेत आणि ती सुपरहिट देखील झाली आहेत.” (Abhijit bhattacharya shocking comment about akshay kumar)

यानंतरही ते थांबले नाही, तर त्यांनी अक्षय कुमारबाबत देखील वक्तव्य केले. त्यांनी अक्षय कुमारच्या स्टारडमच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, “माझ्या संगीताने अक्षय कुमारला स्टार बनवले आहे. जेव्हा त्याला लॉन्च केले होते तेव्हा तो स्टार नव्हता. त्यावेळी त्याला गरिबांचा मिथुन चक्रवर्ती असे म्हटले जात होते. अगदी तसंच जसं‌ मिथुन चक्रवर्ती यांना गरिबांचा अमिताभ बच्चन समजले जाते.”

त्यांनी पुढे सांगितले की, “संगीतात खूप मोठी ताकद असते ते अभिनेत्याला स्टार बनवते. मग ते देव आनंद असो, राज कपूर असो किंवा राजेश खन्ना असो. अक्षय कुमार खिलाडी या चित्रपटानंतर स्टार झाला. या चित्रपटातील ‘वादा रहा सनम’ या चित्रपटाला मी आवाज दिला होता. त्यानंतर त्याच्या अनेक चित्रपटांच्या टायटलमध्ये खिलाडी हा शब्द आला. माझा आवाज त्याला सूट करतो. हे सगळे ॲक्टर आधी स्टार नव्हते, पण माझ्या आवाजाने त्यांना स्टार बनवले आहे.”

खिलाडी हा चित्रपट १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनेक कलाकारांनी काम केले होते. यामध्ये जॉनी लिव्हर, शक्ती कपूर, आयेशा जुलका सारखे अनेक कलाकार होते. या चित्रपटातील गाणी देखील खूप गाजली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘… तो मैं पानी-पानी हो गयी’, भाग्यश्री मोटेच्या हॉट फोटोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

-जेव्हा गायत्री दातार म्हणते, ‘ये मौसम का जादू है मितवा!’ पाहा तिचा लेटेस्ट फोटो

-श्रुती मराठेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; तिच्या ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटोला नेटकऱ्यांची पसंती


Leave A Reply

Your email address will not be published.