‘… तो मैं पानी-पानी हो गयी’, भाग्यश्री मोटेच्या हॉट फोटोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत


मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हटलं की, भाग्यश्री मोटेचे नाव लक्षात येते. ती सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तीमत्त्व आहे. तसेच ती सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंनी ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. याशिवाय तिचे फोटो चाहत्यांना पुरते वेडे करून सोडतात. आपल्या हॉट अदांनी ती चाहत्यांना अक्षरशः घायाळ करते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

नुकतेच भाग्यश्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत, जे बघता बघताच व्हायरल झाले. याचे कारण म्हणजे, यातील तिचा हॉट अंदाज. या फोटोंमध्ये नेटकऱ्यांना अभिनेत्रीची हॉट स्टाईल पाहायला मिळाली आहे. यात ती पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि निळ्या रंगाचे शॉर्ट्स घालून पाण्यात खेळताना दिसली आहे. सोबतच तिने अतिशय हॉट स्टाईलमध्ये फोटोसाठी पोझ दिली आहे.

हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय की, “सैया ने देखा ऐसे, मैं पानी-पानी हो गयी।” तिच्या फोटोसोबतच हे लक्षवेधी कॅप्शनही चर्चेत आलं आहे. या फोटोवर कमेंट करून चाहते तिचे तोंडभरून कौतुक करत आहे. तिच्या कमेंट सेक्शनवर एक नजर टाकली, ते पूर्ण लाल हार्ट ईमोजी आणि फायर ईमोजीने भरलेले दिसेल. (bhagyashri mote shared her hot photo while playing water)

ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही भाग्यश्रीने बऱ्याचदा तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ केले आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर ती आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती हार्दिक गज्जर दिग्दर्शित ‘रावण लीला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता प्रतिक गांधी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा गायत्री दातार म्हणते, ‘ये मौसम का जादू है मितवा!’ पाहा तिचा लेटेस्ट फोटो

-श्रुती मराठेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; तिच्या ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटोला नेटकऱ्यांची पसंती


Leave A Reply

Your email address will not be published.