जेव्हा गायत्री दातार म्हणते, ‘ये मौसम का जादू है मितवा!’ पाहा तिचा लेटेस्ट फोटो


सध्याच्या काळात सर्वचजण सोशल मीडियावर वेळ घालणे पसंत करतात. त्याप्रमाणे, ‘तुला पाहते रे’ फेम गायत्रीही सोशल मीडियावर सक्रिय राहून, चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. फोटो असो वा व्हिडिओ, ती सतत काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. चाहतेही तिच्या पोस्ट्सला भरभरून प्रेम देत असतात. कदाचित यामुळेच तिचे फोटो दरदिवशी इंटरनेटवर व्हायरल होतात. नुकताच गायत्रीने शेअर केलेला फोटो आता चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यासोबत फोटोचे कॅप्शनही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

गायत्री विशेष करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. हा लेटेस्ट फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने केशरी रंगाचा प्रिंटेड टॉप आणि त्याखाली पांढऱ्या रंगाचे प्रिंटेड स्कर्ट परिधान केले आहे. यासोबत एक लाल रंगाची ओढणी घेऊन, गायत्रीने तिचा हा सुंदर लूक पूर्ण केला आहे. शिवाय ती आभाळाच्या दिशेने वर बघताना दिसत आहे.

हा सुंदर फोटो शेअर करत गायत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “ये मौसम का जादू है मितवा!” फोटोसोबत हे कॅप्शनही चाहत्यांना आवडल्याचे दिसून येत आहे. २ तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून हे प्रेम व्यक्त करत आहेत. (gayatri datar shared her photo and said yeh mausam ka jaadu hai mitwaa)

‘तुला पाहते रे’ मधून टीव्हीवर पदार्पण करून, तिने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या सोज्वळ आणि निरागस अभिनयाच्या जोरावर तिने अमाप लोकप्रियता मिळवली. अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या गायत्रीने, आपल्या कॉमिक टायमिंगने देखील सर्वांना प्रभावित केले आहे. ‘तुला पाहते रे’ मालिका संपल्यानंतर तिने ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी शोमध्ये काम करून, प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शिल्पाने पती राज कुंद्राबाबत केला मोठा खुलासा; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सर्वांसमोर म्हणाली…

-दुःखद : शेखर सुमन यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती

-आर्थिक अडचणींमुळे करावी लागली चोरी; ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ फेम ‘या’ दोन अभिनेत्रींना ठोकण्यात आल्या बेड्या


Leave A Reply

Your email address will not be published.