Sunday, April 20, 2025
Home कॅलेंडर Happy Wedding Anniversary : पत्रिकेत मंगळ असल्याने ऐश्वर्याचे लावले होते झाडाशी लग्न, अशी जमली ऐश्वर्या- अभिषेकची जोडी

Happy Wedding Anniversary : पत्रिकेत मंगळ असल्याने ऐश्वर्याचे लावले होते झाडाशी लग्न, अशी जमली ऐश्वर्या- अभिषेकची जोडी

सिने जगतातील सर्वात चर्चेत असणारे क्यूट कपल म्हणून अभिषेक बच्चन (Abhshek Bachchan) आणि ऐश्वर्या रायचे (Aishwarya Rai) नाव घेतले जाते. विश्वसुंदरी ऐश्वर्या राय आजच्याच दिवशी म्हणजे  २० एप्रिलला बच्चन कुटूंबाची लाडकी सुनबाई झाली होती. या शाही विवाह सोहळ्याची सिने जगतात जोरदार चर्चा झाली होती. सर्वात महागडा आणि भव्यदिव्य लग्न सोहळा म्हणून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या विवाह सोहळ्याची सिने जगतात चर्चा होते. मात्र सिने जगतातील या लाडक्या जोडीच्या लग्नातही अनेक विघ्न आणि गृहदोश आले होते. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि  ऐश्वर्या राय २० एप्रिलला आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. 20 एप्रिल 2007 रोजी लग्नबंधनात अडकलेले अभिषेक आणि ऐश्वर्या नेहमीच चर्चेत असतात. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचे सर्व विधी बच्चन कुटुंबीयांच्या प्रतीक्षा या बंगल्यात पार पडले. या दोघांच्या लग्नाची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. त्याचबरोबर एक किस्साही सांगितला जातो. तो म्हणजे अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या रायने एका झाडाशी लग्न केल्याचे बोलले जाते. याचे कारण म्हणजे ऐश्वर्या रायला मंगळ असल्यामुळे लग्नात अडचणी येत होत्या.

यासाठी ऐश्वर्याचे आधी झाडासोबत लग्न करण्यात आले. जेणेकरून मंगळाचा प्रभाव संपेल. इतकंच नाही तर दोघांच्या लग्नाबद्दल असंही म्हटलं जात होतं की, मंगल दोषामुळे हे लग्न जास्त काळ टिकणार नाही. असेही त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र हे सगळे सध्या साफ खोटे ठरवत अभिषेक आणि ऐश्वर्या आनंदात वैवाहिक आयुष्य जगताना दिसत आहेत. दोघांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर ऐश्वर्या आणि अभिषेक यांची पहिली भेट 2000 साली ‘ढाई अक्षर प्रेम के’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ऐश्वर्या सलमान खानला तर अभिषेक करिश्मा कपूरला डेट करत होता. मात्र, दोघांचे हे नाते फार काळ टिकले नाही. यानंतर ऐश्वर्या विवेकसोबत रिलेशनशिपमध्ये आली, पण त्यांचेही ब्रेकअप झाले.

त्यानंतर 2006 ते 2007 या काळात या दोघांची जवळीक वाढली. गुरू या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांची जवळीक वाढल्याचे बोलले जाते. यानंतर ‘गुरू’ चित्रपटाच्या टोरंटो प्रीमियरमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले आणि ऐश्वर्याने लगेचच तिचा प्रस्ताव स्वीकारला. अभिषेक आणि ऐश्वर्याने ‘बंटी और बबली’, ‘उमराव जान’, ‘गुरु’ आणि ‘धूम 2’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा