बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन(Abhishek bachchan) सध्या त्याच्या आगामी ‘दसवीं’ चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपटात अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री यामी गौतम( Yami Gautam) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच या चित्रपटाचे आग्रा जेलमधील कैद्यांसाठी खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. ज्यामुळे अभिषेक बच्चनने दिलेला शब्द पाळला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. काय आहे हे सगळे प्रकरण चला जाणून घेऊ.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिषेक बच्चन आणि यामी गौतमच्या ‘दसवी’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपट ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याआधीच आग्रा जेलमधील कैद्यांसाठी आणि पहारेकऱ्यांसाठी या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘दसवी’ चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. हे खास स्क्रिनिंग ठेवण्याचे कारण म्हणजे या दसवीं चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग या जेलमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि अभिषेक बच्चनने त्यांना चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्याचा शब्द दिला होता. जो त्यांनी पाळला आहे.
या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग तब्बल २००० कैद्यांसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी मोठी स्क्रिन लावण्यात आली होती. यावेळी कैद्यांसोबत दिग्दर्शक तुषार जलोटा, अभिनेता अभिषेक बच्चन, यामी गौतम, निम्रत कौर यांच्यासह जेलच्या अधिकाऱ्यांनी चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला. यानंतर अभिषेक बच्चनने १ वर्ष जुना व्हिडिओ शेअर करत “मागच्या वर्षी दिलेल्या वचनाची पुर्तता केली आग्रा जेलमधील कैद्यांसाठी आमच्या ‘दसवी’ चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित केले गेले होते. या ठिकाणी शुटिंग करतानाचे अनुभव मी कधीच विसरणार नाही.” असे लिहले आहे, तर अभिनेत्री यामी गौतमनेही “चेहऱ्यावरील हास्यच सगळेकाही सांगून जाते” असे म्हणत यावेळीचा फोटो शेअर केला आहे. आता या चित्रपटाची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा