Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड ‘ते कधी माझ्या चित्रपटांची…’, अभिषेक बच्चनने वडील अमिताभ बच्चन यांच्याबद्दल केला विचित्र खुलासा

‘ते कधी माझ्या चित्रपटांची…’, अभिषेक बच्चनने वडील अमिताभ बच्चन यांच्याबद्दल केला विचित्र खुलासा

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे हिंदी चित्रपट जगताचे महानायक म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने ते गेली अनेक दशके चित्रपट जगातावर निर्विवाद वर्चस्व गाजवत आले आहेत. त्यांच्या अभिनय कारकिर्दिची आणि गाजलेल्या चित्रपटांची यादी खूपच मोठी आहे. बॉलिवूड जगतात अमिताभ बच्चन यांच्याइतकी लोकप्रियता आणि प्रसिद्धी खूप कमी लोकांच्या वाट्याला आली आहे. म्हणूनच बच्चन कुटूंबियांचा सिनेजगतावर कायमचाच दबदबा राहिला आहे. मात्र अमिताभ बच्चन यांच्यासारखे अभिनय कौशल्य अभिषेक बच्चनला जमले नाही. त्यामुळे अभिषेक बच्चनची (Abhishek Bachchan) नेहमीच चर्चा होत असते. अलिकडेच अभिषेक बच्चनने धक्कादायक खुलासा केला आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या ‘दसवीं’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे सध्या तो जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. याच निमित्ताने तो कपिल शर्माच्या (Kapil Sharma) कार्यक्रमात गेला होता. यात अभिषेकने अनेक खुलासे केले आहेत. या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अभिषेक बच्चनने अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगताना, “त्यांनी मला कितीही चूका करण्याची मुभा दिली आहे. ज्यामुळे ते कधीही मला मार्गदर्शन करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. तसेच ते कधीही माझ्या चित्रपटाच्या स्क्रिप्टही वाचत नाहीत,” असा खुलासा केला. अभिषेक बच्चनच्या या खुलाश्याने कार्यक्रमातील सगळेच हसायला लागल्याचे दिसत आहे.

दरम्यान, तुषार जलोटा दिग्दर्शित ‘दसवीं’ चित्रपटात अभिषेकने गंगाराम चौधरी नावाच्या राजकीय नेत्याची भूमिका साकारली आहे. ज्यामध्ये तो भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगात जावे लागते, अशी कथा रंगवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन यांच्या पत्नीची भूमिका निम्रत कौरने साकारली आहे. तर यामी गौतमने जेलरची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सध्या प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा