Thursday, July 18, 2024

नुकतंच लग्न झालेल्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या बिकीनी फोटोने वातावरण तापवल!

कॅटरिना कैफही (Katrina Kaif)  हिंदी चित्रपट जगतातील सर्वात सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या  सौंदर्याने तिने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. एकापेक्षा एक दमदार चित्रपट कॅटरिनाच्या नावावर आहेत. प्रत्येक चित्रपटातील तिने साकारलेली आव्हानात्मक भूमिका तिच्या अभिनयाचे वेगळेपण सिद्ध करत असते. त्यामुळेच कॅटरिना कैफला बॉलिवूडची सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. आपल्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारी कॅटरिना सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.यावरुन ती आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. सध्या कॅटरिनाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत ज्याची चर्चा रंगली आहे.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारी मनमोहक अभिनेत्री कॅटरिना कैफचे काही बोल्ड फोटो सध्या सर्वत्र चर्चेत आहेत.अभिनेत्री कॅटरिना कैफने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन हे  फोटो तिने शेअर केले आहेत. ज्यामधील कॅटरिनाच्या घायाळ करणाऱ्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत. या फोटोंमध्ये कॅटरिना वाळूमध्ये बसलेली दिसत आहे.

काळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. तिच्या या मनमोहक सौंदर्यात तिने डोक्यात घातलेली काळी पांढरी हॅट आणखीनच भर घालत आहे. कॅटरिनाच्या या व्हायरल फोटोवर तिचे चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. फक्त चाहतेच नव्हेतर अनेक दिग्गज कलाकारांनीही या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या विकी कौशलसोबत विवाह केल्यानंतर खूप चर्चेत आली होती. दोघांच्या प्रेमप्रकरणाची दिर्घकाळ चर्चा रंगली होती. शेवटी या चर्चांना पुर्णविराम देत लग्न करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या या शाही विवाह सोहळ्याची माध्यमांमध्ये मोठी चर्चा रंगली होती. मार्च २०२१ मध्ये त्यांनी लग्न केले होते. कॅटरिना लवकरच टायगर ३ चित्रपटात झळकणार आहे. याआधी सलमान खानसोबतचे तिचे टायगर जिंदा है आणि एक था टायगर हे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा