Sunday, March 29, 2026
Home बॉलीवूड …म्हणुन लग्नाच्या वाढदिवशी अभिषेकवर प्रचंड रागावली होती ऐश्वर्या, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

…म्हणुन लग्नाच्या वाढदिवशी अभिषेकवर प्रचंड रागावली होती ऐश्वर्या, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे इंडस्ट्रीमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. मिस वर्ल्ड असणाऱ्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन २००७ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांना आराध्या नावाची एक गोड मुलगी सुद्धा आहे. एकदा अभिषेक बच्चनला त्यांच्या लव्ह लाइफविषयी विचारले असता, तो त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या वेळी झालेला एक किस्सा सांगतो. जेव्हा ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनवर प्रचंड रागावली होती.

याबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला की, आम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस मालदीवच्या समुद्र किनारी कॅन्डल लाइट डिनर प्लॅन केला होता. पण जेव्हा आम्ही खुर्चीवर बसून एकमेकांना पाहत होतो, तेव्हा आलेल्या वादळाने सगळ्या मेणबत्त्या विजून गेल्या आणि जेवणासाठी आणलेल्या सगळ्या पदार्थांमध्ये सुद्धा वाळू पडल्याने सगळं जेवण खराब झालं, ज्यामुळे ऐश्वर्या प्रचंड रागावली होती.” (abhishek bachchan with aishwarya rai reveals second anniversary)

याबद्दल ऐश्वर्या रॉयला विचारले असता ती म्हणाली की, “हो, त्यावेळी मला अभिषेक चा खुप राग आला होता. जोरदार वारे आणि उडणाऱ्या वाळूमुळे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा सगळा प्लॅन खराब झाला होता.” या सगळ्या गोंधळामुळे बीचवर कॅन्डल लाइट डिनरचा प्लॅन अजिबात करत जाऊ नका, असेही ते विवाहित जोडप्यांना सल्ला देतात.

विशेष म्हणजे ऐश्वर्या अभिषेकवर चिडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापुर्वीही अभिनेत्याला अनेकदा तिच्या रागाचा सामना करावा लागला आहे. एकदा तर ऐश्वर्याच्या रागामुळे त्याला दोन रात्री बाहेर काढाव्या लागल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच

हे देखील वाचा