Wednesday, July 3, 2024

मामा जीतेंद्रप्रमाणे अभिनयात आजमावला हात, पण मार्ग बदलताच फळफळलं नशीब, बनलाय बॉलिवूडचा हिट डायरेक्टर

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या सिनेमातून समाजप्रबोधनाचे काम करतात. त्यापैकीच एक प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे अभिषेक कपूर होय. अभिषेक यांनी आतापर्यंत बॉलिवूडला अनेक सिनेमे दिले आहेत. अभिषेक हे शुक्रवारी (दि. ०६ ऑगस्ट) त्यांचा ५१वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया, त्यांच्याविषयी खास गोष्टी.

अभिनेता ते प्रसिद्ध दिग्दर्शक
प्रसिद्ध दिग्दर्शक अभिषेक कपूर (Abhishek Kapoor) यांचा जन्म ६ ऑगस्ट, १९७१ रोजी मुंबईत झाला आहे. त्यांचे शिक्षणही मुंबईतूनच पूर्ण झाले आहे. आज मोठे दिग्दर्शक असलेल्या अभिषेक यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात अभिनेता म्हणूनच केली होती. त्यांनी सन १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उफ्फ! ये मोहब्बत’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचा मार्ग बदलला आणि स्वत:ला एका अभिनेत्यापासून प्रसिद्ध दिग्दर्शकात रुपांतरित केले. अभिषेक यांनी सन २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आर्यन’ या सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek kapoor (@gattukapoor)

प्रसिद्ध सिनेमे
‘आर्यन’ या सिनेमानंतर त्यांनी ‘रॉक ऑन’, ‘काय पो छे’, ‘फितूर’, ‘केदारनाथ’ आणि ‘चंदीगढ करे आशिकी’ यांसारख्या हिट सिनेमांची निर्मिती केली. या सिनेमांमध्ये फरहान अख्तर, आदित्य रॉय कपूर, सुशांत सिंग राजपूत आणि आयुषमान खुराना यांसारख्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek kapoor (@gattukapoor)

‘काय पो छे’ सिनेमाच्या ९ वर्षपूर्तीनिमित्त भन्नाट शुभेच्छा
सन २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काई पो छे’ (Kai Po Che) या सिनेमाला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अभिषेक कपूर यांनी एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला होता. आजही हा सिनेमा एक उत्तम भावनात्मक, उत्तम स्क्रिप्ट आणि उत्तम दिग्दर्शन यासाठी आठवला जातो. हा सिनेमा चेतन भगत यांच्या ‘३ मिस्टेक्स ऑफ माई लाइफ’ या पुस्तकावर आधारित आहे.

अभिषेक कपूरने त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले होते की, “‘काई पो छे’ हा सिनेमा माझ्या करिअरमधील मैलाचा दगड असलेला सिनेमा आहे. रॉक ऑन सिनेमानंतर नवीन चेहऱ्यांना घेऊन अतिशय संवेदनशील विषयावर एखादा सिनेमा बनवणे खूपच आव्हानात्मक होते. हा सिनेमा असा होता ज्याने मला एक उत्तम कहाणीकार म्हणून तयार तर केले सोबत समाधान देखील दिले. मला आज हे बघताना खूप आनंद होतो, की हा सिनेमा वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात बसलेला आहे. या गोष्टींनी माझ्या विश्वासाला अधिक वाढवले की, मी माझ्या प्रत्येक सिनेमात माझ्या मर्यादांना आव्हान देतो.” या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी देखील सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत त्याच्या करिअरमधील उत्तम सिनेमा असल्याचे सांगितले आहे.

अभिषेक कपूरचा काही दिवसांपूर्वी ‘चंडीगढ करे आशिकी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत होते. मात्र, या सिनेमाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कोरोना काळात सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आठवडाभरतच चित्रपटगृह बंद झाले होते.

दिग्गज अभिनेत्याशी नाते
अभिषेक कपूर यांचे बॉलिवूड दिग्गज अभिनेते जीतेंद्र यांच्याशी कौटुंबिक नाते आहे. जीतेंद्र यांना अभिषेक हे भाचे लागतात. अभिषेक यांची आई मधुबाला ही जीतेंद्र यांची बहीण आहे. त्यामुळे जीतेंद्र यांची मुले तुषार कपूर आणि एकता कपूर हे अभिषेक यांचे आते भाऊ-बहीण आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
दीपिकाचा बर्थडे : लग्नासाठी धर्म बदलल्याने कायम चर्चेत राहिलेली अभिनेत्री, बघा तिचे मुस्लीम नाव
‘तुझी चड्डी नाही उतरवली, तर आदित्य नाव नाही सांगणार’, वादाशी घट्ट नातं असणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक
‘माझे ८ तास म्हणजे बाकीच्यांचे १४- १५ तास, अक्षय कुमारने केली बाकी कलाकारांशी तुलना

हे देखील वाचा