‘ससुराल सिमर का’ या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री दीपिका कक्कर. दीपिका शनिवारी (दि. ०6ऑगस्ट) तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिकाने तिच्या सौंदर्याच्या जोरावर आणि नैसर्गिक अभिनय कौशल्याने सर्वांचीच मने जिंकली. मात्र, दीपिका तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत राहिलीये. खासकरुन जेव्हा तिने लग्नासाठी धर्म बदलला, तेव्हापासून ती सर्वाधिक चर्चेत आली.
दीपिका आणि तिचा पहिला पती रौनक यांच्यात सतत वाद होत असत. यातूनच त्यांनी 2015मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्या कठीण प्रसंगात दीपिकाला तिचा रील लाईफ जोडीदार अभिनेता शोएब इब्राहिम याने चांगली साथ दिली.
View this post on Instagram
तिथपासूनच त्यांच्यातील प्रेम फुलू लागले. पुढे दोघांनी 2018 मध्ये मुस्लिम रितीरिवाजांनुसार विवाह केला. लग्न करण्यासाठी दीपिकाने इस्लाम धर्म स्विकारला होता. त्यावेळी तिचे नाव बदलून फैजा केले, पण आजही सगळे तिला दीपिका या नावानेच ओळखतात.
अधिक वाचा –