×

अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘काई पो चे’ सिनेमाची नऊ वर्ष, पोस्ट शेअर करत दिल्या चित्रपाच्या आठवणींना उजाळा

समाजप्रबोधन करत आपल्या सिनेमातून एक चांगला संदेश देखील देतात. याच विभागातील एक दिग्दर्शक म्हणजे अभिषेक कपूर (Abhishek Kapoor). अभिषेक यांनी आजपर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम सिनेमे दिले आहेत. त्यांचा असाच एक अप्रतिम सिनेमा म्हणजे ‘काई पो छे’ (Kai Po Che). आज या सिनेमाला नऊ वर्ष पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने अभिषेक कपूरने एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आजही या सिनेमाला एक उत्तम भावनात्मक, उत्तम स्क्रिप्ट आणि उत्तम दिग्दर्शन यासाठी आठवला जातो. हा सिनेमा चेतन भगत यांच्या ‘3 मिस्टेक्स ऑफ माई लाइफ’ या पुस्तकावर आधारित असून हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता.

अभिषेक कपूरने त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले, “‘काई पो छे’ हा सिनेमा माझ्या करिअरमधील मैलाचा दगड असलेला सिनेमा आहे. रॉक ऑन सिनेमानंतर नवीन चेहऱ्यांना घेऊन अतिशय संवेदनशील विषयावर एखादा सिनेमा बनवणे खूपच आव्हानात्मक होते. हा सिनेमा असा होता ज्याने मला एक उत्तम कहाणीकार म्हणून तयार तर केले सोबत समाधान देखील दिले. मला आज हे बघताना खूप आनंद होतो, की हा सिनेमा वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात बसलेला आहे. या गोष्टींनी माझ्या विश्वासाला अधिक वाढवले की, मी माझ्या प्रत्येक सिनेमात माझ्या मर्यादांना आव्हान देतो.” या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी देखील सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत त्याच्या करिअरमधील उत्तम सिनेमा असल्याचे सांगितले आहे.

अभिषेक कपूरचा काही दिवसांपूर्वी ‘चंडीगढ़ करे आशिकी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत होते. मात्र या सिनेमाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कोरोना काळात सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आठवडाभरतच चित्रपटगृह बंद झाले होते.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

Latest Post