‘…पर लोग मुझे गिराने मे कई बार गिरे’, ‘ती’ पोस्ट शेअर करून कोणावर निशाणा साधतेय मानसी नाईक?

मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या ग्लॅमरस फोटोंची, व्हिडिओची नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. या अभिनेत्रींची प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट त्यांच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. या अभिनेत्रींमध्ये सगळ्यात जास्त होते ती अभिनेत्री मानसी नाईकची (Manasi Naik). मानसी नाईकच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसत असते. प्रत्येक फोटोत तिच्या लूकवर चाहते फिदा होत असतात. मात्र यावेळी तिच्या फक्त व्हायरल फोटोने नव्हे, तर त्यासोबत दिलेल्या खतरनाक कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोणती आहे ती पोस्ट चला जाणून घेऊ. 

मानसी नाईक ही मराठी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या दमदार अभिनयाची आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याची तिच्या चाहत्यांमध्ये नेहमी चर्चा होत असते. मानसी नाईक फक्त आपल्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर तडफदार डान्ससाठीही प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते. सध्या तिच्या एका व्हायरल पोस्टने सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडले आहे. कारण तिने या पोस्टमध्ये दिलेला कॅप्शनच खूप भन्नाट आहे.

सध्या मानसी नाईकच्या एका पोस्टची सगळीकडे चर्चा रंगली आहे. यामध्ये तिने “न मैं गिरा, और न मेरी उम्मीदों के मीनार गिरे, पर लोग मुझे गिराने मे कई बार गिरे…” असा सुंदर कॅप्शन दिला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये मानसीने पांढऱ्या रंगाची साडी, दागिने आणि हातात लाल बांगड्या घातलेल्या दिसत आहेत. या पारंपारिक पोशाखामुळे ती खूपच मनमोहक दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र या पोस्टमध्ये दिलेला कॅप्शनमधील इशारा कोणासाठी दिला आहे, हाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

दरम्यान, मानसी नाईकच्या अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते. तिने ‘कोकणस्थ’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘कुटूंब’, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे. तिच्या डान्सचीसुद्धा नेहमीच चर्चा होत असते. मानसी नाइकच्या बाई वाड्यावर या गाण्याने सगळ्यांनाच नाचायला लावले  होते. तिच्या डान्सच्या तडक्यावर तर तरुणाई नेहमीच घायाळ होत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

Latest Post