अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. माजी पंतरप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात कंगना रणौत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटातील तिचा फस्ट लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतील तिचा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. परंतु प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र आता कंगना आणखी एका राजकीय नेत्याची भूमिका साकारणार आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
सध्या अभिनेत्री कंगना राणौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान कंगनाच्या हातात आणखी एक प्रोजेक्ट आहे. ती लवकरच दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या चित्रपटात दिसणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर मधुर भांडारकर कंगना राणौतसोबत चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. हा एक राजकीय थ्रिलर असेल. हा चित्रपट एका काश्मिरी सिंगरच्या जीवनावर आधारित आहे. जिची आतंकवाद्यांनी हत्या केली होती. कंगणाच्या या चित्रपटात ती काय धमाल करणार याचीच आता प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे.
कंगना राणौतचा शेवटचा रिलीज झालेला ‘धाकड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. पण, यानंतरही कंगनाकडे चित्रपटांची कमतरता नाही. रिपोर्ट्सनुसार, ‘पेज 3’ फेम दिग्दर्शक मधुर भांडारकर एक चित्रपट बनवणार आहे. हा चित्रपट दहशतवाद्यांनी मारलेल्या काश्मिरी गायकाच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असेल. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट महिला केंद्रित चित्रपट असेल. या चित्रपटात मधुर भांडारकरने कंगना राणौतला मुख्य भूमिकेसाठी कास्ट केले आहे. मधुर भांडारकर त्याचा ‘बबली बाऊन्सर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बनवणार असल्याचीही बातमी आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तमन्नाशिवाय सौरभ शुक्ला देखील दिसणार आहे.
हेही वाचा –
सुंदर चेटकीण बनून सगळ्यांना घाबरवायला आलीय ‘पिशाचिनी’, ट्रेलर पाहून चाहत्यांची उडाली घाबरगुंडी!
संस्कार हो दुसरं काय! आर माधवनने रजनीकांत यांचे पाय शिवत घेतला आशीर्वाद, सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद
जणू लाल परीच! सई लोकूरचे नवीन फोटो चर्चेत