मंगळवारी (१५ फेब्रुवारी) रात्री पंजाबी इंडस्ट्री स्टार दीप सिद्धूचा (Deep Sidhu) अपघात झाला आणि त्यात झालेल्या प्राणघातक जखमांपासून तो वाचू शकला नाही. त्याच्या मृत्यूनंतर, त्याचा भाऊ सुरजीत याने ट्रकचालकाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता, ज्याचे वाहन दीपच्या कारला धडकले. IPC च्या कलम २७९ (रॅश ड्रायव्हिंग) आणि ३०३A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली. आता फरार चालकाला पोलिसांनी दिल्ली बायपास येथून अटक केल्याचे वृत्त आहे. तसेच आरोपी चालकाला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हरचे नाव कासिम खान असून तो सिंगार गावचा रहिवासी आहे. अपघाताच्या वेळी चालक अहमदाबादहून मुझफ्फरनगरला कोळसा घेऊन जात होता. खरखोडाचे एसएचओ जसपाल सिंग यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे मान्य केले आहे. आरोपीने सांगितले आहे की, ट्रक पुढे जात होता आणि त्याने निष्काळजीपणे ब्रेक लावला. त्यानंतर दीपची कार गाडीच्या मागील बाजूस जोरात धडकली. (accused truck driver arrested in punjabi actor deep sidhu accident case know full details)
दरम्यान, ३७ वर्षीय अभिनेता दीप सिद्धू याच्यावर बुधवारी (१६ फेब्रुवारी) लुधियानाच्या थ्रिके गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत अभिनेत्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते.
गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली, तेव्हा दीप सिद्धू चर्चेत आला होता. त्याचवेळी काही लोकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक ध्वजही लावला. या प्रकरणात दीप सिद्धू याच्यावर आंदोलकांना भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून दीपला धमक्या येत असल्याचं सांगण्यात येत होतं.
प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारात ५०० हून अधिक पोलीस जखमी झाले आणि एका आंदोलकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दीप सिद्धूवर सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप होता. जो त्याच्या एका मैत्रिणीने अपलोड केला होता.
हेही वाचा :