×

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट

झी मराठी या वाहिनीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. अल्पावधीतच मालिकेने बहुसंख्य प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बसून बघता यावी अशी ही मालिका आहे. मालिकेत प्रत्येक स्वभाव गुणाचे, प्रत्येक वयोगटातील पात्रांचा समावेश आहे. त्यामुळे अगदी कोणत्याही वयाच्या व्यक्तीने बसून ही मालिका पाहिली तरी त्याला कंटाळा येणार नाही. या वर्षी झी मराठीने अनेक नवीन विषय घेऊन मालिका आणल्या आहेत. अशीच आजच्या २१ व्या शतकात एकत्र कुटुंब पद्धती काळाआड होत असल्याने कुटुंबाला बांधून ठेवणारी आणि नाती जपणारी ही मालिका सध्या खूप लोकप्रिय होत आहे.

मालिकेतील सगळी पात्र देखील खूप चांगल्या पद्धतीने रेखाटली आहेत. यात मुख्य भूमिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सिड आणि आदिती ही जोडी महाराष्ट्रातील प्रत्येकाला आवडत आहे. त्याची प्रेमकहाणी देखील पाहायला सगळ्यांनाच आवडत आहे. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, या मालिकेतील एक अभिनेत्री मालिकेचा निरोप घेत आहे.

मालिकेत मोठ्या बाई म्हणजेच सिद्धार्थच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली जोशी यांनी ही मालिका सोडली आहे. मालिकेतील मोठ्या बाई हे पात्र अत्यंत समंजस आणि विचारी पात्र आहे. त्यांचे पात्र सगळ्यांना खूप आवडत होते. परंतु आता त्यांनी या मालिकेतून निरोप घेतल्याने सगळ्यांना खूप दुःख झाले आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागी येणारी नवीन व्यक्तिरेखा कशी असेल आणि हे पात्र ती व्यक्ती नीट निभावू शकेल का ? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.

हार्दिकने या आधी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम केले आहे. मालिकेतील त्याचे राणादा हे पात्र सगळ्यांना खूप आवडते होते. तसेच त्याच्या सिद्धार्थच्या या पात्राला देखील सगळ्यांची पसंती मिळत आहे. अमृताने या आधी ‘स्वराज्य जननी जिजामाता’, ‘ललित २०५’, ‘दुहेरी’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

Latest Post