×

‘मला हे जमत नाही’, सिद्धार्थ चांदेकरची ‘ती’ पोस्ट आली सोशल मीडियावर चर्चेत, एकदा वाचाच

मराठी चित्रपटसृष्टीतील डॅशिंग अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. मराठी चित्रपटसृष्टीत खूप चर्चेत असतो. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या अभिनयाने आणि लूकने तो सर्वांनाच त्याच्यकडे आकर्षित करत असतो. त्याचे वैयक्तिक आयुष्य असो नाहीतर त्याचे व्यावसायिक आयुष्य असो तो नेहमीच त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियामार्फत माहिती देत असतो. त्याचे फोटो देखील वेगाने सर्वत्र व्हायरल होत असतात. अशातच त्याची एक पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आली आहे.

सिद्धार्थने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहिले आहे की, “मला नाही माहित, मला नाही येत. मला नाही जमत. हे म्हणायला किती धाडस लागतं. मी कुणीतरी आहे, हे इतरांना सांगण्याचा अट्टाहास त मी आहे हे स्वतः ल कधी सांगणार.” ही पोस्ट शेअर करून त्याने मी मीच आहे असे कॅप्शन दिले आहे. त्याची ही प्रेरणादायी पोस्ट अनेकांना आवडली आहे. त्याचे चाहते त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आहे. त्याची ही पोस्ट जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. (Siddharth chandekar post viral on social media)

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

सिद्धार्थ चांदेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१० साली अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनतर त्याने ‘क्लासमेट’, ‘वजनदार’, ‘झिम्मा’, ‘बस स्टॉप’, ‘सिटी ऑफ ड्रिम’, ‘रणांगण’, ‘हिरकणी’ या सारख्या चित्रपटात काम करून त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पडली आहे. तो सध्या स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस ना’मालिकेत काम करत आहे

सिद्धार्थच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास त्याने २०२१ मध्ये त्याची गर्लफ्रेंड मिताली मयेकर हिच्यासोबत विवाह केला आहे. मिताली देखील मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. जवळपास चार वर्षांच्या रिलेशननंतर ते विवाह बंधनात अडकले आहेत.

हेही वाचा :

Latest Post