Tuesday, July 9, 2024

HAPPY BIRTHDAY | अभिनेत्री राधिका मदनला अल्पावधीतच ‘या’ चित्रपटांनी मिळवून दिली लोकप्रियता

बॉलिवूडमध्ये अल्पावधीत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये राधिका मदनचे (Radhika Madan) नाव प्रामुख्याने घेतले जाते.आपल्या अभिनयाने अगदी कमी वेळात तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१४ मध्ये राधिकाने छोट्या पडद्यावर आगमन केले होते. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्येहीव आपल्या अभिनयाची छाप पाडत अनेक गाजलेल्या चित्रपटांंमध्ये काम केले. ज्यामधील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. १ मे अभिनेत्री राधिकाचा वाढदिवस. याच निमित्ताने पाहूया तिच्या गाजलेल्या चित्रपटांची यादी. 

पटाखा (२०१८)
‘पटाखा ‘ हा दोन बहिणींची कथा असलेला विशाल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. चरणसिंग पथिक यांच्या लघुकथेवर आधारित सान्या मल्होत्रा ​​आणि राधिका मदन या दोन बहिणींची ही कथा यामध्ये दाखवली आहे. हा चित्रपट राधिका मदनचा पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये तिने बडकीची भूमिका साकारली होती. तुम्ही हा चित्रपट Amazon Prime Video वर स्ट्रीम करू शकता.

अंग्रेजी मीडियम (२०२०)
अंग्रेजी मीडियम हा एक विनोदी नाटक चित्रपट आहे ज्यामध्ये इरफान खान, राधिका मदान, दीपक डोबरियाल आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत. 2017 मध्ये आलेल्या ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. उदयपूर या राजस्थानी शहरात जन्मलेला आणि वाढलेला चंपक (इरफान खान) त्याची एकुलती एक मुलगी तारिकाची भूमिका यामध्ये राधिकाने रंगवली आहे. त्याच्या मुलीला लंडनला जायचे आहे आणि इरफान खान आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करतो. या चित्रपटातील भूमिकेसाठी राधिकाचे खूप कौतुक झाले होते.

मर्द को दर्द नहीं होता (२०१८ )
मर्द को दर्द नहीं होता हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे, जो जागतिक स्तरावर ‘द मॅन हू फील्स नो पेन’ म्हणून प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिमन्यू दासानी, राधिका मदन, गुलशन देवय्या, महेश मांजरेकर, जिमित त्रिवेदी आणि प्रतीक परमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कथा एका आजाराने त्रस्त असलेल्या सूरज नावाच्या मुलाभोवती फिरते. त्याला वेदना होत नाहीत. सुप्री (राधिका मदन) ही सूरजची बालपणीची प्रेयसी आहे आणि ती त्याला साथ देते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

शिद्दत : द जर्नी बियॉन्ड लव्ह (२०२१)
‘शिद्दत’ हा रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे ज्यात सनी कौशल, राधिका मदन, मोहित रैना आणि डायना पेंटी आहेत. कथेत एका तरुण प्रियकराचे चित्रण केले आहे, चित्रपटाचे चित्रीकरण वेगवेगळ्या देशांमध्ये झाले आहे. कार्तिक सिंघानियाची भूमिका राधिका मदनने साकारली आहे आणि सनी कौशल तिच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपच ओटीटी प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर रिलीज करण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा