Thursday, April 18, 2024

अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत हिने चित्रपटसृष्टीत 17 वर्षे पूर्ण केली आहेत. या खास प्रसंगी बॉलिवूड क्वीनने दिग्दर्शक अनुराग बासूसोबत तिच्या जुन्या आठवणी शेअर केल्या. अनुराग बासूसोबतचा एक फोटो शेअर करत कंगनाने सांगितले की, ‘लाइफ इन मेट्रो‘च्या शूटिंगदरम्यान अनुराग तिला कशाप्रकारे सूचना देत असे.

‘मेट्रो लाईफ’ या चित्रपटाला 17 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टाेरीसोबत कंगनाने एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये कंगना अनुराग बासूसोबत सोफ्यावर बसलेली दिसत आहे. फाेटाेत अनुराग चित्रपटाच्या सेटवर कंगनाला काहीतरी समजावताना दिसत आहे. खरे तर, हा फाेटाे ‘लाइफ इन अ मेट्राे’च्या सेटवरील आहे. या चित्रपटातून अनुरागने कंगनाला संधी दिली हाेती. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने एक उत्तम कॅप्शनही लिहिले आहे.

या इन्स्टा स्टोरीमध्ये कंगनाने अनुराग बासूला टॅग केले आणि लिहिले, “या पागल जीनियस अनुराग बासूचे धन्यवाद, ज्याने मला 17 वर्षांपूर्वी 28 एप्रिल 2006 रोजी लॉन्च केले, हा मेट्रो सेट (2006) मधील त्याचा आणि माझा फोटो आहे. त्यााने अशा प्रकारे मला ट्रेनिंग दिले…. ‘तू चुप कर’ हा त्याचा ट्रेनिंग दरम्यानचा आवडता डायलॉग … हा हा आय लव्ह यू अनु… प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद.” ती पुढे म्हणाली, “मला सांगण्यात आले की, अभिनेत्रींची शेल्फ लाइफ 4-5 वर्षे असते… बरं, मी काल चित्रपटाची 17 वर्षे पूर्ण केली…”

kangna ranaut
Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

‘लाइफ इन अ मेट्रो’चे दिग्दर्शन अनुराग बसू यांनी केले होते. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त धर्मेंद्र, नफिसा अली, शिल्पा शेट्टी, के के मेनन, शायनी आहुजा, इरफान खान, कोंकणा सेनशर्मा आणि शरमन जोशी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. कंगनाने 2006 मध्ये आलेल्या ‘गँगस्टर’ या थ्रिलरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

कंगानाच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘धाकड’, ‘क्विन’, ‘पंगा’, ‘क्रिश 3’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे.(bollywood actress kangna ranaut remembered the old training days with anurag basu after completing 17 years in industry )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : प्रदीप सरकार चित्रपट दिग्दर्शित करण्यापूर्वी बनवायचे जाहिराती, अशी झाली धमाकेदार सुरुवात
अधुरी प्रेम कहाणी! या व्यक्तीमुळे आला ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यात दुरावा

हे देखील वाचा