Friday, December 6, 2024
Home बॉलीवूड सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटामुळे खुप चर्चेत आहे. सुरुवातीला या चित्रपटाने फारसे कलेक्शन केले नाही. मात्र, नंतर ईदच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाने चांगली कमाई केली. यादरम्यान, सलमान ‘आप की अदालत’मध्ये पोहोचला, जिथे त्याला काही प्रश्न विचारण्यात आले, ज्यामुळे अभिनेता चांगलाच चर्चेत आला आहे.

सलमान खान (salman khan) रजत शर्माच्या प्रसिद्ध शो ‘आप की अदालत’चा भाग बनला. यादरम्यान अभिनेत्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र, सलमानच्या तोंडून एका प्रश्नाचे उत्तर ऐकून सगळेच अवाक् झाले. खरे तर, सलमान खानने करण जोहर लग्नाशिवाय बाप झाल्याचे सांगितले. यावर सलमान खान म्हणाला, “हो, मीही तेच करण्याचा प्रयत्न करत होतो, पण नंतर कायदा बदलला.”

सलमान खान पुढे म्हणाला, “मला मुलं खूप आवडतात, पण जेव्हा मुलं येतात तेव्हा आईही येते. आई त्यांच्यासाठी खूप चांगली असते, पण आमच्या घरात फक्त आई अन् आईच पडलेल्या आहेत. माझ्याकडे संपूर्ण जिल्हा आहे. संपूर्ण गाव आहे, पण माझ्या मुलाची आई माझी बायकोच असेल.” याशिवाय सलमान खानसोबत इतरही अनेक विषयांवर चर्चा झाली, ज्यावर त्याने मजेशीर उत्तरे दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

नुकताच सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे सलमान खानने तब्बल चार वर्षानंतर बॉक्स ऑफिसवर कमबॅक केले आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमाान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर सलमान लवकरच ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ देखील आहे. याशिवाय यशराज चित्रपटाअंतर्गत बनत असलेल्या ‘टायगर वर्सेस पठाण’मध्ये भाईजान शाहरुख खानसोबत दिसणार आहे.(bollywood actor salman khan was plannning a child without wedding like karan johar actor talked on dad)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जयंती विशेष : प्रदीप सरकार चित्रपट दिग्दर्शित करण्यापूर्वी बनवायचे जाहिराती, अशी झाली धमाकेदार सुरुवात

पुण्यतिथी | करोडोंची संपत्ती असलेल्या अचला सचदेव यांची अखेरच्या क्षणी होती अशी अवस्था, रुग्णालयातच गेला होता जीव

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा