Saturday, July 6, 2024

‘पिंजरा’ ते ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ असा आहे अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये संस्कृती बालगुडे हिचा समावेश होतो. टेलिव्हिजनवरून आपल्या करिअरला सुरुवात केलेली संस्कृती आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक डिमांडेड अभिनेत्री झाली आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणतीही भूमिका असो तिने तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. अगदी साध्या भूमिकेपासून ते अगदी मॉर्डन आणि बोल्ड भूमिका तिने निभावल्या आहेत. सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर वाढला आहे. अशातच रविवारी (१९ डिसेंबर) ती तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला यानिमित्त जाणून घेऊया तिचा आतापर्यंतचा अभिनय क्षेत्रातील प्रवास…

संस्कृतीचा (Sanskruti) जन्म १९ डिसेंबर १९९२ साली पुणे येथे झाला. तिच्या आईचे नाव संजीवनी बालगुडे आणि वडिलांचे नाव संजय बालगुडे हे आहे. पुण्यातील सिंबोईसिस शाळेत तिचे शिक्षण पूर्ण झाले. तसेच एसपी महाविद्यालयात तिचे पुढील शिक्षण झाले. लहान असल्या पासूनच तिला डान्सिंग आणि ॲक्टिंगची आवड होती. तसेच तिला पेंटिंग करायला देखील खूप आवडते. (Acteess sanskruti balgude celebrate her birthday, let’s know about her career)

संस्कृतीने टेलिव्हिजनवरून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने झी मराठीवरील ‘पिंजरा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले होते. २०११ साली आलेल्या या मालिकेतील संस्कृतीला खूप ओळख मिळाली. महाराष्ट्रातील घराघरात तिची ओळख निर्माण झाली. नंतर २०१३ आणि २०१४ साली तिने ‘विवाहबंधन’ या मालिकेत काम केले.

यानंतर मात्र तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि चित्रपटसृष्टीतून देखील तिला ऑफर येऊ लागल्या. तिने २०१४ साली ‘सांगतो ऐका’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नंतर लगेच २०१५ साली तिने ‘शॉर्टकट’ या चित्रपटात काम केले. चित्रपटात ती ग्लॅमरस अंदाजात दिसली होती. नंतर ‘निवडुंग’, फ्रेंडशिप ‘अनलिमिटेड’, ‘टेक केयर गुड नाईट’, ‘भय’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात काम केले.

तसेच तिची ‘काळेधंदे’ ही वेबसीरिज देखील ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. सध्या ती ‘कोण होणार सुपरस्टार’ या शोमध्ये होस्ट आहे. लवकरच ती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ.निखिल राजेशिर्के हे कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा :

सरकारच्या ‘या’ निर्णयासाठी बालिकावधू मालिकेतील आनंदीने म्हटले धन्यवाद, शेअर केली पोस्ट

अक्षरा सिंगच्या बॉस लेडी लूकवर नेटकरी फिदा, ट्रोलर्स देखील करताय लूकचे कौतुक

शाहरुख खानबद्दल बोलताना अभिनेत्री रेखा झाल्या भावुक, म्हणाल्या “…म्हणूनच तो आज हिऱ्यासारखा चमकत आहे’

 

 

हे देखील वाचा