सरकारच्या ‘या’ निर्णयासाठी बालिकावधू मालिकेतील आनंदीने म्हटले धन्यवाद, शेअर केली पोस्ट

देशात बालविवाह ही एक गंभीर समस्या आहे. बेकायदेशीर असूनही भारतात अजूनही अनेक भागात लहान वयातच मुलीचे लग्न लावले जाते. बालविवाहावर आधारित अनेक सिनेमे, मालिका आतापर्यंत तयार झाल्या आहेत. या विषयावर सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेली मालिका म्हणजे ‘बालिका वधू.’ २००८ मध्ये ही मालिका कलर्स टीव्हीवर प्रदर्शित केली होती. या मालिकेतून जिवंत विषय आणि समाजातील धगधगणारे, कटू सत्य लोकांसमोर सादर केले होते. या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला म्हणूनच्या सध्या या मालिकेचा दुसरा भाग काढण्यात आला असून तो टीव्हीवर प्रसारित होत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत शिवांगी जोशी मुख्य भूमिका साकारत आहे.

भारत सरकारने समाज सुधारणेशी संबंधित एक मोठे पाऊल उचलले आहे. पूर्वी मुलीच्या लग्नाचे वय १८ होती. आता कायद्यानुसार लग्न करण्यासाठी मुलीचे वय कमीत कमी २१ असावे, असा कायदा संमत करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहेत. सर्वसामान्य लोकांसोबतच ‘बालिका वधू २’ मधील आनंदी देखील या निर्णयाने खुश झाली आहे. या कायद्यामुळे कलर्स टीव्हीच्या इंस्टाग्राम अधिकृत अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये मालिकेतील छोटी आनंदी आणि मोठी आनंदी हात जोडून उभ्या आहेत. त्यांच्या फोटोवर लिहिले आहे की, ‘सरकारचे मनापासुन आभार लग्नाचे वय १८ चे २१ वर्ष केल्याबद्दल’. तर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आनंदी सरकारला मनापासून धन्यवाद म्हणते, योग्य निर्णय घेऊन चांगल्या दिशेला पाऊल उचलले आहे.”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बालिकावधू या मालिकेचा खरा उद्देश बालविवाहाचे विदारक सत्य लोकांपर्यंत पोहचवणे हा असून, मालिकेमध्ये बालविवाह केल्यामुळे कोणत्या समस्या येऊ शकतात हे दाखवले आहे. त्यातच आता सरकारने मुलींच्या लग्नाचे वय २१ केले आहे. ही गोष्ट सर्वांसाठीच आनंदाची आहे. ही मालिका ज्या उद्देशाने लोकांसमोर सादर केली होती. तो उद्देश पूर्ण झाला आहे.

हेही वाचा-

‘चकाचक’मध्ये साराला कॉपी केल्यानंतर, सबा खानने भोजपुरी अभिनेता देवानंदसोबत केली धमाल; पाहा व्हिडिओ

पती विकी जैनने अंकिता लोखंडेचा वाढदिवस केला खास, शेअर केली ‘मोस्ट रोमॅंटिक’ पोस्ट

सुशांतसोबत ब्रेकअपनंतर पुर्णपणे तुटली होती अंकिता लोखंडे, नंतर ‘असा’ थाटला विकी जैनसोबत संसार

Latest Post