अक्षरा सिंगच्या बॉस लेडी लूकवर नेटकरी फिदा, ट्रोलर्स देखील करताय लूकचे कौतुक


भोजपुरी (Bhojpuri) अभिनेत्री अक्षरा सिंग (Akshara singh) सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी गाण्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पंजाबी आणि बॉलिवूड गायक बादशाहचे सुपरहिट ठरलेल्या ‘पाणी-पाणी’ गाण्यांचे भोजपुरी व्हर्जन बादशाह आणि तिने तयार केले आहे. या ‘पाणी पाणी’ गाण्याच्या भोजपुरी व्हर्जनला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता अधिकच वाढत आहे. तर दुसरीकडे ती तिच्या काही नवीन फोटोंमुळे लक्ष वेधून घेत आहे.

अक्षरा सिंगच्या फोटोंना भरभरून लाईक आणि कमेंट मिळत असून, या फोटोंमध्ये ती लेडी बॉसच्या अवतारात दिसत आहे. नेटकरी तिच्या फोटोवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहे. शिवाय तिच्या या वेगळ्या आणि आकर्षक लूकचे देखील कौतुक करत आहे. अक्षराने या फोटोमध्ये पांढर्‍या आणि बहुरंगी रंगाचे जॅकेट घातले असून, त्यात ती खूप स्टायलिश दिसत आहे. तिने तिच्या ड्रेसला मॅचिंग रंगाचे शूज घातले आहे. शिवाय तिच्या तांबूस रंगाच्या केसांमुळे तिच्या लुकला एक वेगळाच टच देखील मिळत आहे.

अक्षराने तिचे हे फोटो तिच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बस येही खाती आरा जानी’ या गाण्याच्या सेटवरून पोस्ट केले आहेत. हे गाणे तिने स्वतः गायले असून, तिच्या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित केले आहे. या फोटोमध्ये अक्षरा खूप छान दिसत आहे. तिच्या या फोटोंचे प्रेक्षक मनापासून कौतुक करत आहे. परंतु या अभिनेत्रीला आधी खूप ट्रोल केले होते. अभिनेत्रीने ब्रालेस ड्रेस घालून काही फोटो पोस्ट केले होते त्याच्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत होती. युजर्सने त्या फोटोंवर खूप चुकीच्या कमेंट केल्या होत्या. काही युजर्सने असे देखील लिहिले होते की, ‘आता ही देखील पॉर्नस्टार बनणार आहे.’ नवीन फोटोमध्ये अक्षराने तिचा नवीन अंदाज दाखवला आहे. अक्षराला ट्रोल करणाऱ्या लोकांची तोंड
तिने बंद केली आहे. तिचे टीकाकारच आता तिचे कौतुक करताना थकत नाहीत.

अक्षरा सिंग आणि सुपरस्टार खेसारी लाल यादव या जोडीने चित्रित केलेली भोजपुरी गाणी आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. दरम्यान खेसारी आणि अक्षराचे अत्यंत रोमँटिक गाणे ‘जब से बोले ली कोयला रिया’ हे देखील खूप व्हायरल झाले होते. अक्षरा सिंग या गाण्यात बोल्ड परफॉर्मन्स करताना दिसली. ‘हिरो नंबर १’ चित्रपटातील हे गाणे खेसारी लाल यादव आणि कल्पना यांनी एकत्र गायले होते. गाण्याचे बोल आजाद सिंग यांनी लिहिल्या आहेत तर संगीत घुंगरू यांनी दिले आहे.

हेही वाचा-

शाहरुख खानबद्दल बोलताना अभिनेत्री रेखा झाल्या भावुक, म्हणाल्या “…म्हणूनच तो आज हिऱ्यासारखा चमकत आहे’

Bigg Boss 15: सलमान खानने दिली रितेशला धमकी; म्हणाला, ‘राखीला काही केले तर….’

‘चकाचक’मध्ये साराला कॉपी केल्यानंतर, सबा खानने भोजपुरी अभिनेता देवानंदसोबत केली धमाल; पाहा व्हिडिओ


Latest Post

error: Content is protected !!